अन् महिला काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी गॅस एजन्सी समोरच मांडली चुल

मानसी पवार यांच्या नेतृत्वाखाली झाले आंदोलन
अन् महिला काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी गॅस एजन्सी समोरच मांडली चुल

रावेर Raver|प्रतिनिधी-

गॅॅस सिलेंडरच्या (Gas cylinder) किंमती (prices) दिवसेंदिवस वाढत आहे. दोन दिवसाआधी ५० रुपयांनी वाढ झाली आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे. गॅॅस सिलेंडरच्या वाढत्या किंमतीचा निषेध करण्यासाठी सोमवारी महिला काँग्रेस (Mahila Congress) पदाधिकारी यांनी गॅॅस एजन्सीसमोर (gas agency) चूल (Chul) मांडून संतप्त भावना (Angry feelings) व्यक्त केल्या.

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या (Maharashtra Pradesh Mahila Congress) अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांचे आदेशानुसार तसेच आ.शिरीष चौधरी,जिल्हा महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ,तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांच्या नेतृत्वाखाली रावेर तालुका कॉंग्रेस आघाडीच्या महिला अध्यक्षा मानसी महेंद्र पवार व सेवादल तालुका महिला अध्यक्ष भाग्यश्री पाठक यांनी सावदा रोडवरील लक्ष्मी गॅॅस एजन्सी समोर चूल मांडून गॅस दरवाढीचा निषेध (Prohibition) नोंदविला.

Related Stories

No stories found.