
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव नाही तर मी आत्महत्या करुन घेईल आणि तुझ्या घरच्यांना देखील जीवंत ठेवणार नाही अशी धमकी तरुण देत होता. तरुणाकडून वारंवार (Threats from youth) दिल्या जाणार्या धमक्यांमूळे तणावात असलेल्या तरुणीने (young woman) गळफास घेवून आत्महत्या (committed suicide) केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी त्रास देणार्या अक्षय रामचंद्र सुरवाडे (रा. पिंप्राळा) याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील एका भागात मयत तरुणी आपल्या कुटुंबियांसोबत वास्तव्यास होती. त्या तरुणीला अक्षय सुरवाडे हा तरुण तरुणीला फोन करुन माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेवावेच लागेल नाही तर मी आत्महत्या करुन टाकेल आणि तुझ्या घरच्या लोकांना सुद्धा मारुन टाकेेल अशी धमकी वारंवार प्रत्यक्ष भेटून देखील देत होता. यावेळी तरुणीने त्या तरुणाचा मोबाईल क्रमांक ब्लॉक लिस्टमध्ये टाकला होता. मात्र तरुणीची बहिण ही परीक्षेसाठी त्यांच्याकडे आली असल्याने तरुणाने तीच्या व्हॉट्सअपवर मॅसेज करुन तुझ्या बहिणीला माझ्यासोबत बोलायला सांग नाही तर मी तुम्हाला सर्वांना पाहून घेईल अशी धमकी देत होता. तसेच तिच्या लहान बहिणीला देखील मॅसेज करुन धमकी देत होता.
घरी येवून दिली धमकी
सुरवाडे हा तरुण दि. 6 मार्च रोजी तरुणीच्या घरी गेला आणि तरुणीला बोलला की, तु जर माझ्याी बोलली नाही तर मी आत्महत्या करुन घेईल आणि तुम्हाला सुद्धा मारुन टाकेल अशी धमकी त्याने दिली होती. परंतु यावेळी तरुणीने त्याच्यासोबत प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला. त्याच दिवशी तरुणाविरुद्ध पोलिसात तक्रार देखील दिली होती.
त्रासाला कंटाळून तरुणीने मृत्यूला कवटाळले
तरुणाकडून वारंवार आत्महत्येस मारण्याची धमकी मिळत असल्याने तरुणी प्रचंड मानसिक त्रासात होती. या त्रासाला कंटाळून तरुणी घरात एकटीच असतांना तीने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली होती. याप्रकरणी तीच्या आत्महत्येस प्रवृत्त करणार्या अक्षय सुरवाडे या तरुणाविरुद्ध रविवारी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल कण्यात आला आहे.