
भुसावळ bhusaval । प्रतिनिधी
गेल्या आठवड्याभर भुसावळ शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस (rained and hailed) व काही ठिकाणी गारा पडल्या. यामध्ये सर्वात जास्त नुकसान कांदा (Damage to onion crops) या पिकांचे झाले. त्या संदर्भात कृषी विभागाने (Department of Agriculture) पंचनामे (Panchnama) केले मात्र काही ठिकाणी कोर्या कागदावर (Signatures on blank paper) स्वाक्षर्या घेतल्याने संतप्त झालेल्या (angry farmers) शेतकर्यांनी आज (दि. 2) रोजी थेट भुसावळचे तालुका कृषी अधिकार्यांच्या (Taluka Agriculture Officer) कार्यालयात येऊन जाब विचारला मात्र त्या ठिकाणी संबंधित अधिकारी हजर नसल्याने त्यांच्या टेबलवर नोटा (nota) व सडके कांदे (rotten onions) टाकून शेतकर्यांनी संताप (anger) व्यक्त केला.
जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अनेक महिन्यांपासून अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे नुकसान झालेला आहे आठवड्याभरापासूनही अवकाळी पाऊस गारपीट वादळी वारा सुरूच आहे. मोठ्या प्रमाणात भुसावळ तालुक्याला अवकाळीचा फटका बसला आहे. मात्र अद्यापपर्यंत शेतकर्यांना मदतही नाही आणि पंचनामेही नाही. त्यामुळे संतप्त शेतकर्यांनी याबाबत प्रशासनाला जाब विचारण्यासाठी थेट भुसावळ तालुका कृषी कार्यालय गाठले. या कार्यालयात शेतकर्यांना एकही अधिकारी दिसून न आल्याने संतप्त शेतकर्यांनी कृषी अधिकार्याच्या टेबलावर नोटा आणि सडलेले कांदे फेकत संताप व्यक्त केला आहे. कृषी सहाय्ययकाकडून कोर्या कागदावर सह्या घेऊन अंदाजे पंचनामे केल्याचा आरोप शेतकर्यांनी केला. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी संतप्त शेतकर्यांचा ठिया सुरूच राहील असा निर्धार या ठिकाणी शेतकर्यांनी घेतला असून दोन तासापासून आंदोलन सुरू आहे.
शेतकर्यांचा वाली कोण आहे? गेली चार दिवस पाऊस होतोय गारपीट झाली. मोठे नुकसान झाले इतका मोठा तालुका आहे व या ठिकाणी कृषी अधिकारी जागेवर नाही. खुर्च्या रिकाम्या आहेत म्हणून अधिक संताप होत आहे. हे कार्यालय आहे का काय आहे? हे सरकार अविचारी आहे.
तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी अधिकार्यांना शोधायला आलो असता ते बेपत्ता आहेत. कृषी सेवकांनी शेतकर्यांच्या कोर्या कागदावर स्वाक्षर्या घेऊन पंचनामे केले आहे. त्या पंचनामाची प्रत आम्हाला हवी आहे. तहसीलदारांकडे गेलो तर ते सांगतात शेतीच्या मालाची किंमत ठरवण्याचे अधिकार कृषी अधिकार्यांना आहे तीकडे जा. अशी आमची फिरवा फिरत सुरू असून हे शेतकर्यांचे सरकार आहे हे नुसते सांगायला आहेे. सर्व शेतकरी जमा होवून कार्यालयात गेले असता कृषी अधिकारी न भेटल्याने संतप्त शेतकर्यांनी त्यांच्या टेबलवर सडके कांदे फेकून तीव्र निषेध केला.
एकीकडे व्यापारी माल घ्यायला तयार नाही? मग या कांद्याचे करणार काय? जागेवर कृषी अधिकारी नाही. पंचनामाची प्रत मिळत नाही, त्यामुळे या अधिकार्यांनाही कांद्याची भेट देत असल्याचे वेल्हाळे येथील शेतकरी योगेश पाटील यांनी सांगितले. तर महिला शेतकरी विमल पाटील यांनी देखील संताप व्यक्त केला त्या म्हणाल्या आम्ही शेतकरी सकाळी सात वाजता शेतात जातो व हे पगार घेणार्या अधिकारी अकरा वाजले तरी कार्यालयात नाही. काय पंचनामे केले हेही समजत नाही. आमच्या कांदा गेला मका गेला त्यांचे अधिकार्यांना काही घेणं देणं नाही.
या संदर्भात कृषी अधिकारी दिलीप चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की ग्रामीण भागात पंचनामे करताना तलाठी ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी आवश्यक असतात मात्र, त्यांची संख्या कमी आहे त्यामुळे एका व्यक्तीवर सहा ते सात गावांची जबाबदारी आहे. तरी देखील पंचनामे सुरू आहेत. वेल्हाळे गावचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत पंचनामाची प्रत आम्ही दाखवू शकतो शेतकर्यांनी संयम राखावा असे आवाहन तालुक्यातील वरणगाव मंडळ कृषी अधिकारी दिलीप चौधरी यांनी केले आहे.