...आणि म्हणून खासदार रक्षा खडसेंनी पंतप्रधानांना घातले साकडे

किसान रेलसह केळी पिकासाठी हॉर्टीकल्चर क्लस्टरमध्ये जळगावचा समावेश करण्याबाबत दिले निवेदन
 ...आणि म्हणून खासदार रक्षा खडसेंनी पंतप्रधानांना घातले साकडे

मुक्ताईनगर Muktainagar

खासदार रक्षाताई खडसे (MP Raksha Khadse) यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची भेट घेत किसान रेल (Kisan Rail) सुरु केल्याबद्दल आभार मानून, रावेर, सावदा येथून किसान रेल वाढविणे आणि भुसावळ व निंभोरा स्टेशन येथून नवीन किसान रेल सुरु करणे तसेच केळी पिकासाठी (banana crop) हॉर्टीकल्चर क्लस्टर (Horticulture cluster) मध्ये जळगांवचा समावेश करणे बाबत मागणी केली.

आज खासदार श्रीमती रक्षाताई खडसे (MP Raksha Khadse) यांनी प्रधानमंत्री कार्यालय दिल्ली येथे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी (Prime Minister Narendra Modi) यांची भेट घेऊन किसान रेलच्या (Kisan Rail) यशस्वी संचालनासाठी समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने आभार मानले व रावेर लोकसभा क्षेत्रातील रावेर व सावदा रेल्वे स्टेशन येथून किसान रेल वाढविणे बाबत व भुसावळ व निंभोरा रेल्वे स्टेशन येथून नवीन किसान रेल (New Kisan Rail) सुरु करणे तसेच केंद्रीय कृषी मंत्रालयाने नव्याने सुरु केलेल्या फलोत्पादन क्षेत्र विकास (हॉर्टीकल्चर क्लस्टर डेव्हलोपमेंट प्रोग्राम) अंतर्गत केळी पिकासाठी (banana crop) जळगांव (jalgaon) जिल्ह्याचा समावेश करण्यात यावा बाबत मागणी केली.

बागायतीच्या समग्र विकासासाठी मोदी सरकारच्या सप्तवर्षीपुर्ती निमित्त केंद्रीय कृषी मंत्रालयद्वारे (Union Ministry of Agriculture) विविध फळांसाठी देशातील १२ राज्यातील ५३ जिल्ह्यांमधील पथदर्शी कार्यक्रमाचा विचार करून फलोत्पादन क्षेत्र विकास (हॉर्टीकल्चर क्लस्टर डेव्हलोपमेंट प्रोग्राम) (सीडिपी) (Horticulture cluster) योजना सुरु केली आहे, सदर योजनेंतर्गत केळी पिकासाठी जळगांव जिल्ह्याचा देखील समावेश करण्यात यावा याबाबत सुद्धा खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी सविस्तर चर्चा करून मागणी केली.

रावेर लोकसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणवर उत्कृष्ट प्रतीच्या केळीचे उत्पादन होत असुन, खूप मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड (Banana cultivation) करण्यात येते असते. सदर भागातील केळीची उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर मागणी असुन, जर फलोत्पादन क्षेत्र विकास (हॉर्टीकल्चर क्लस्टर डेव्हलोपमेंट प्रोग्राम) अंतर्गत केळी पिकासाठी जळगांव जिल्ह्याचा समावेश झाल्यास त्याअनुषंगाने येथे होणाऱ्या औद्योगिक विकासाच्या (Industrial development) दुर्ष्टीने व केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी हे खूप महत्वपूर्ण व फायद्याचे ठरेल.

तरी केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी फलोत्पादन क्षेत्र विकास (हॉर्टीकल्चर क्लस्टर डेव्हलोपमेंट प्रोग्राम) अंतर्गत केळी पिकासाठी जळगांव जिल्ह्याचा समावेश होणेबाबत आपल्यास्तरावरून संबंधित मंत्रालयाला शिफारस करण्यात यावी तसेच अधिक किसान रेल वाढविण्यात येऊन नवीन किसान रेल (New Kisan Rail) सुरु करण्यात याव्या याबाबत खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदीजी यांच्याकडे कळकळीची विनंती केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com