..आणि म्हणून शहरातील अनेक प्रकल्प रखडले

जळगाव फर्स्टचे डॉ.राधेश्याम चौधरी यांचा आरोप
..आणि म्हणून शहरातील अनेक प्रकल्प रखडले
Jalgaon Municipal Corporation

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जळगाव शहराच्या विकासासाठी (development of the city) केंद्र आणि राज्य शासनाकडून (Central and State Governments) अनेक योजना मंजूर (Plan approved) झाल्या आहेत. काही योजनांचे काम सुरु आहे. मात्र घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाचे (Solid waste processing project) काम अजुनही झालेले नाही. अधिकार्‍यांच्या चुकांमुळे (Due to the mistakes of the officials) हे प्रकल्प रखडले असून यात दोषी असणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई (Action on officers)करावी अशी मागणी जळगाव फस्ट्चे समन्वयक डॉ. राधेश्याम चौधरी (coordinator of Jalgaon First, Dr. Radheshyam Chaudhary) यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

जळगाव फर्स्टच्या कार्यालयात गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषद ते बोलत होते. यावेळी दीपक परदेशी उपस्थित होते. महापालिकेतर्फे गेल्या तीन ते चार वर्षात अनेक मोठ्या योजना राबविण्यात आल्या. यामध्ये अमृत अंतर्गत पाणी पुरवठा योजना, मलनिस्सारण योजना, घरकुल योजना, घनकचरा प्रकल्प, स्वच्छ हवा कार्यक्रमाचा समावेश आहे. मात्र, प्रत्येक योजनेत मनपा अधिकार्‍यांनी चुका करून ठेवल्याने या योजनांच्या कामांमध्ये अनेक त्रुटी निर्माण होण्याची शक्यता असल्याचे डॉ.चौधरी यांनी सांगितले.

अमृत पाणी पुरवठा योजनेच्या निविदेत वॉटरमीटरची तरतूद नसल्याने योजना पूर्ण झाली तरी जळगावकरांना 24 तास पाणी पुरवठा करणे कठीण असल्याचेदेखील ते म्हणाले. मलनिस्सारण योजनेच्या निविदेत रस्ता दुरुस्तीची तरतूद नसल्याने मनपाला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तसेच अनेक कामांमध्ये त्रुटी असल्याचेही डॉ.राधेश्याम चौधरी यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com