..आणि म्हणून जळगावकर नगरसेवकांना शिकवणार धडा

संतप्त नागरिकांचा इशारा ; महापौर जयश्री महाजन यांना निवेदन
..आणि म्हणून जळगावकर नगरसेवकांना शिकवणार धडा

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

महापालिकेत (Municipal Corporation) नुकत्याच पार पडलेल्या महासभेत उपमहापौर यांच्या वार्डातील विकासकामांना(development work) विरोध (Opposition ) केल्यावर खडाजंगी झाली होती. नगरसेवक कैलास सोनवणे व उपमहापौर कुलभुषण पाटील यांच्यात वाद होवून धक्काबुक्की झाली होती. विकासकामांना विरोध करणार्‍या नगरसेवकांना (corporators) आगामी काळात धडा शिकवू (teach a lesson) असा इशारा (Warning) नागरिकांनी (citizens) दिला आहे. पिंप्राळ्यातील विकासकामांच्या खर्चाच्या संविदेला तातडीने महासभेत मंजुरी द्यावी अशी मागणीही पिंप्राळा येथील रहिवाशांनी निवेदनाव्दारे महापौरांकडे केली आहे.

दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत प्राप्त निधीमधून प्रस्तावित 4 कोटी 99 लाख 88 हजार 121 रुपयांच्या कामांना तातडीने महासभेत मंजुरी देण्यात यावी, या निधीमधून पिंप्राळा परिसरातील कुंभार वाडा, सिध्दार्थ नगर, गणपती नगर, भिमनगर, आझाद नगर, पिंप्राळा गावठाण, हुडको रस्ता, खंडेराव नगर, मयुर कॉलनी, संत मीराबाई नगर आदी भागातील रस्ते डांबरीकरण करणे, रस्ते काँक्रिटीकरण करणे, आरसीसी गटारी बांधणे, पेव्हर ब्लॉक बसविणे, मुख्य रस्त्याचे काम करणे, नाल्यावरील पूल बांधणे, नाल्याला संरक्षण भिंत बांधणे अशी महत्वाची व नागरिकांच्या जिव्हाळ्याची कामे करण्यात येणार आहेत.

तातडीने महासभेत मंजुरी द्यावी

या कामांची सर्व कायदेशिर प्रक्रिया पुर्ण झालेली आहे. त्यामुळे सदर कामांच्या खर्चाच्या संविदेला तातडीने महासभेत मंजुरी देण्यात यावी, अशी विनंती वरील सर्व कॉलनी भागातील रहिवाश्याकडून करण्यात येत आहे. या विकास कामांना विरोध करणार्‍या नगरसेवकांना येणार्‍या निवडणुकांमध्ये जळगावकर नागरिक धडा शिकविल्या शिवाय राहणार नाहीत, असा इशारा देखील रहिवाश्यांकडून देण्यात आला. निवेदनावर शुभम बारी, मंगेश जगताप, नगराज पाटील, विजय दांडगे, भावेश भोई, मनोज गुंजाळ, शोभा जाधव, नाना पारधी, संतोष सोनार, आशाबाई पाटील, तुषार कोळी, विश्वनाथ आमोदे, ज्योती वाघमारे आदींची स्वाक्षरी आहे.

अन्यथा मनसेस्टाईल आंदोलन

शहरातील प्रत्येक प्रभागातील विविध समस्यांबाबात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले. यासंदर्भात मनसेचे कार्यकर्त्यांनी शहरात असलेल्या समस्यांबाबत रोष व्यक्त करत तातडीने समस्या सोडविण्यात यावे अशी मागणी मनसे महानगराध्यक्ष विनोद शिंदे केली. शहरात अस्वच्छता कायम असून स्वच्छता केवळ कागदावरच होत आहे. याबाबत ठेकेदारावर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही.

सत्ताधारी व विरोधक यावर का बोलत नाही. किंवा आयुक्त प्रशासन का ? लक्ष देत नाही. यामध्ये कुणाची मिलीभगत आहे असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. या समस्या लवकरात लवकर न सोडल्यास मनसे स्टाइलने आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला. याप्रसंगी आशिष सपकाळे, संदीप महाले, पंकज चौधरी, कुणाल पाटील, योगेश पाटील, प्रफुल कोळी, समाधान पाटील, अक्षय बिर्‍हाडे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com