...आणि म्हणून ग्रामिण भागात आजही तांब्या पितळाच्या भांड्याना होते कथील पॉलीश

...आणि म्हणून ग्रामिण भागात आजही तांब्या पितळाच्या भांड्याना होते कथील पॉलीश

महेश पाटील

उंटावद Untawad ता.यावल वार्ताहर

१५ ते २० वर्षांपूर्वी घरातील तांबे व पितळेच्या भांड्यांना (Copper and brass utensils) कलई (tin polished) (पाँलीश) केली जात होती व कलई करणारा कारागीर (Artisan) प्रत्येक महिन्याला गावात येत होता व योग्य त्या दराने महिला आपल्या घरातील भांड्यांना कलई करून घेत होत्या. मात्र आज संगणकाच्या आधुनिक युगात कंपन्यांनी बाजारात नवनवीन भांडी विक्रीसाठी आणल्याने त्या भांड्यांना कलई करण्याची आवश्यकता नसली तरी आजही तांब्या पितळीची भांडी वापरली जात आहेत.

पुर्वी घरोघरी चुलीवर स्वयंपाक होत होता म्हणून भांड्यांना कलई (tin polished) करणे गरजेचे होते. परंतु आज बहुंताशी गँसचा वापर होत असल्याने व आधुनीक पद्धतीची भांडी बाजारात आल्याने त्या भांड्यांना कलईची आवश्यकता भासत नाही.

असे असले तरी मात्र ग्रामीण भागात (rural areas) काही घरांमध्ये आजही तांबे व पितळाची भांडी वापरली जातात. म्हणून पूर्वी एक महिन्याने येणारा कलई करणारा कारागीर (Artisan) आज सहा महिने आठ महिन्यांनी का होईना परंतु ग्रामीण भागात येतो व मागणीनुसार भांड्यांना कलई हि करून देतो. कलई करणाऱ्या व्यक्तीला पूर्वीसारखे उत्पन्न आज मिळत नाही. परंतु पारंपारिक कारागिरी असल्याने मिळेल त्या वेळात कलई कारागीर गावागावात जाऊन भांड्यांना आजही कलई करीत आहे.

आजही ग्रामिण भागातील अनेक घरांमध्ये तांब्या,पितळासह जर्मनची भांडी परंपरांगत रितीने आढळून येतात. वडिलोपार्जित भांडी असल्याने तो वारसा म्हणून आजही काही कुंटूंबामध्ये जतन केला जात आहे.

या भांड्यांचा उपयोग सणासुदीच्या दिवसांसह पापड कुरडया बनविण्यासाठी केला जातो. गॅसच्या युगातही ग्रामिण भागात चुल टिकून आहे. मुबलक प्रमाणात वाळलेले लाकडे मिळत असल्याने आणि चुलीवरील जेवणाची लज्जतच वेगळी असल्याने चुल गॅसपुढे मोठा भाव खात आहे. सध्याच्या स्थितीत गॅसचे (gas) दर हजारापर्यंत गेल्याने ग्रामिण भागात गॅस केवळ महत्वाच्या व घाईच्या वेळेसच वापरला जातो.विविध कार्यक्रम, सणासुदीच्या काळात मात्र अनेकजण चुलीला पसंती देतात. चुलीवर स्टिलची भांडी काळी पडत असतात. त्यांना घासणे मोठे जिकरीचे असते.त्यापेक्षा तांब्या पितळीची व जर्मन धातूची भांडी जरी काळी पडत असली तरी ती घासून स्वच्छ करणे सोपे असते.

तांब्या पितळीच्या भांड्याना कलई केल्याने भांड्यावरील डाग निघून जात भांडे चकचकीत होत असते. तांब्या पितळाच्या भांड्यात अन्न शिजवण्यामागे शास्त्रीय व आरोग्यवर्धक असे कारण आहे. यात शिजवलेले अन्न चविष्ट तर बनतेच त्यासोबतच शरीराला आवश्यक असलेल्या तांब्या पितळाच्या धातूची कमतरताही पूर्ण करत असते. त्यामुळे आजही ग्रामिण भागात ही भांडी टिकून आहेत. त्यामुळेच कलई करणारेही टिकून आहेत. मात्र याचे प्रमाण कमी झालेले असले तरी अस्तित्व दिसून येत आहे. हे विशेष.

पुर्वी १५ ते २० रूपयांमध्ये भांड्यांना होणारी कलई आज ५० ते ७० रूपयांना होते कारण कलईसाठी लागणारे कथील,सुहागी,कोळसा व चरका हे साहीत्य महाग झाल्याने कलईचेही भाव वाढलेत. काहीही असो मात्र भांड्यांना कलई करणारा कारागीर गावात आला की जुुन्या आठवणींना नक्कीच उजाळा मिळतो.

Related Stories

No stories found.