आणि म्हणून बहिणाबाई, डॉ आनंदीबाई, मलाला युसुफजाई अवघ्या जगाच्या प्रेरणादायी...

सुवर्ण महोत्सवी वर्षात नूतन मराठा महाविद्यालयात कर्तृत्ववान महिलांची यशोगाथा व्याख्यानमाला
आणि म्हणून बहिणाबाई, डॉ आनंदीबाई, मलाला युसुफजाई अवघ्या जगाच्या प्रेरणादायी...

जळगाव jalgaon

कर्तृत्वाला (KARTRTVALA) सिमेची मर्यादा (Boundary limits ) नसते. कोपर्‍यात लावलेल्या अगरबत्तीचा सुगंध जसा खोलीभर दरवळून खोलीत प्रसन्नता निर्माण करते. तसेच कर्तृत्वाचे ही आहे. खान्देश कन्या बहिणाबाई, (Khandesh Kanya Bahinabai) भारताच्या पहिल्या डॉक्टर आनंदीबाई जोशी (Dr. Anandibai Joshi) आणि पाकिस्तानची नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफजाई (Malala Yousafzai) यांच्या कार्याचा सुगंधही असाचा आहे. त्यांचे कार्य (Work) पिढ्यान पिढ्या प्रेरणादायी (Inspirational) ठरणार आहे. असा सुर नूतन मराठा महाविद्यालयात (Nutan Maratha College) आयोजित कर्तृत्ववान महिलांची यशोगाथा सांगणार्‍या व्याख्यानमालेत (lecture series) निघाला.

Nutan Martha college logo
Nutan Martha college logo

व्याख्यानमालेच्या आजच्या आठव्या दिवशी तीन व्यक्त्यांनी कर्तृत्ववान महिलांची यशोगाथा विशद केली.

प्रा. भाग्यश्री पाटील यांनी जजाऊ वंदना सादर केली.

पहिल्या सत्रात प्रा. अनाम शेख यांनी मलाला यांच्या कार्याची माहिती दिली. जर तुम्हाला युद्ध संपवायची असतील तर, बंदुकीच्या जागी पुस्तक, रणगाड्याच्या जागी पेन आणि सैनिकांच्या जागी शिक्षक पाठवा असं म्हणणार्‍या पाकिस्तानच्या नोबेल पुरस्कार विजेत्या मलाला युसुफजाई यांच्या कार्याची माहिती दिली.

त्या पुढे म्हणाल्या की मलालाने पाकिस्तानातील दहशतवादी संघटना कडाडून विरोध करत आपले स्रि शिक्षणाचे व्रत अविरतपणे सुरु ठेवले. याचा परिणाम म्हणून हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या तरी देखील त्या डगमगल्या नाहीत तर अधिक जोमाने ते आपल़ं काम करु लागल्या आणि म्हणूनच त्यांना नोबेल पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

या सत्रात डॉ. नितीन बाविस्कर अध्यक्ष म्हणून उपस्थित होत. अध्यक्षीय भाषणात त्यांनी अवघ्या सतराव्या वर्षीच नोबेल पुरस्कार प्राप्त करणारी मलाला ही जगातील सर्वात तरुण नोबेल पारितोषिक विजेती ठरली आहे, म्हणून मलालाचे कर्तृत्व निश्रि्चतच भुषणावह आणि अभिमानास्पद आहे.

जन्म देणारी आई, बहीण, शिक्षिका ते आयुष्यभर साथ देणारी पत्नी अशा सगळ्याच भुमिकेत चोख कर्तृत्व बजावणारी महिला खरोखरच विश्वाची जननी आहे असं सांगून त्यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संयोजिका डॉ इंदिरा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या व्याख्यानमालेचं कौतुक केले.

दुसर्‍या सत्रात प्रमुख वक्त्या प्रा. रिना पवार यांनी भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या आठवणींना उजाळा दिला.

अवघ्या एकविस वर्षं जगलेल्या छोट्याशा आयुष्यातून खुप मोठा संदेश देवून जाणार्‍या आनंदीबाई जोशी तत्कालीन स्त्रि शिक्षण चळवळ आणि समाजव्यवस्थेत क्रांती घडवून आणण्यासाठी धगधगता निखारा ठरल्या. त्या प्रचंड देशाभिमानी, धर्माभिमानी आणि संस्कृतीप्रिय होत्या, त्यांच्या पति पत्नीच्या नात्याला गुरु शिष्याच्या नात्याची झालर होती. 1886 साली म्हणजे अनिष्ट रुढी आणि परंपरांनी बरबटलेल्या काळात भारतीय महिला अमेरीकेतून एम डी डॉ ची पदवी सन्मानाने प्राप्त करते हेच आनंदीबाई जोशी यांचं मोठं कर्तृत्व असल्याचे प्रा. रिना पवार यांनी सांगितले.

या सत्रात महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. आर. बी. देशमुख अध्यक्ष म्हणून उपस्थित होते, त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आनंदीबाई जोशी यांचा थोडक्यात जीवनपरिचय देत नारीशक्तीच्या कार्याचे कौतूक केले. ज्याला स्रि प्रेयसी म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला, ज्याला पत्नी म्हणून कळाली तो सितेचा राम झाला

ज्याला बहीण म्हणून कळाली तो मुक्ताबाई चा ज्ञानोबा झाला ज्याला आई म्हणून कळाली तो जिजाऊ चा शिवबा झाला. असा हा नारीचा महिमा आणि त्या नारीशक्ती ची ही यशोगाथा खरोखरच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

तिसर्‍या सत्रात डॉ. सुषमा तायडे यांनी जीवनाचं तत्त्वज्ञान साध्या आणि सोप्या शब्दात सांगणार्‍या खान्देश कन्या बहिणाबाई चौधरी यांच्या आठवणींना साभिनय सादरीकरणाच्या माध्यमातून उजाळा दिला. मंचावर, सुप, सुपात दाणे, बाजूलाच जाते आणि जात्यावर बहिणाबाई ओव्या गाते असा जिवंत आणि देखणा बहिणाबाईच्या गाण्यांचा कार्यक्रमाने एक वेगळीच रंगत आणली होती. खोप्या मधे खोपा, अरे संसार संसार,चुल्हा पेटता पेटेना, धरत्रीच्या कुशीमधी,धरत्री ले दंडवत, अशा अनेक बहारदार गीतातून बहिणाबाईंच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी आपल्या साभिनय सादरीकरणाला विराम दिला.

या सत्रात डॉ. ललिता हिंगोणेकर अध्यक्ष म्हणून लाभल्या. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात निसर्गकन्या बहिणाबाई यांच्या लेखणीतून आपल्या भोवतालच्या घडामोडी, निसर्ग, निसर्गातील सौंदर्य, माणूस, माणसाच्या प्रवृत्ती, मानवी नातं, नात्यातील वीण, घरातील मंडळी, शेजारी पाजारी असा व्यापक गोतावळा दिसून येतो.

त्यांच्या मरणोत्तर जेव्हा सोपानदेव चौधरी यांनी त्यांच्या कविता आचार्य अत्रे यांना दाखवायला नेल्या तेव्हा आचार्य अत्र्यांनी धरतीच्या कुशीत अचानक सुवर्ण मोहरांनी भरलेला हंडा सापडावा तसा हा अनमोल ठेवा आहे, बहिणाबाईच़ं काव्य म्हणजे बावनकशी सोनं आहे अस़ं म्हणून गौरव केला. अशा या बहीणाबाई आपल्या मातीत होऊन गेल्या त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेऊनच विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी असं नाव दिलं गेलं, त्यांच्या विषयी मला संधी मिळाली याचं आभार मानत आणि व्याख्यानमालेचं कौतुक करत डॉ ललिता हिंगोणेकर यांनी अध्यक्षीय समारोप केला.

deshdoot logo
deshdoot logo

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा पल्लवी शिंपी यांनी तर आभारप्रदर्शन प्रा मानसी वाघ यांनी केले

सदर कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख, उपप्राचार्य डॉ. एन. जे. पाटील, उपप्राचार्य डॉ .राजेंद्र देशमुख, उपप्राचार्य डॉ. एस. ए. गायकवाड, कार्यक्रमाच्या संयोजिका डॉ. इंदिरा पाटील सर्व शाखेचे विभाग प्रमुख आणि प्राध्यापक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com