अन् अंबऋषींनी परिधान केला 51 भाराचा चांदीचा करदोडा

येवती गावाची परंपरा, लोकसहभागाच अनोखे दर्शन
अन् अंबऋषींनी परिधान केला 51 भाराचा चांदीचा करदोडा

येवती Yevati ता. बोदवड । वार्ताहर

बोदवड तालुक्यातील येवती येथे अंबऋषी महाराज (Amb Rishi Maharaj) यांची करदोडा दिवाळी (Kardoda Diwali) सोमवारी मोठ्या उत्साहात साजरी (Celebration) करण्यात आली. लोकसहभागातून (Through public participation) सुमारे 51 भाराचा चांदीचा करदोडा अंबऋषी महाराजांना परिधान करण्यात आला.

सर्वसाधारणपणे दिवाळीचा सण वसुबारस पासून सुरू होऊन दर्श अमावस्या म्हणजेच लक्ष्मीपूजन ,बलिप्रतिपदा, भाऊबीज अशी साजरी केली जाते. मात्र बोदवड तालुक्यातील येवती येथे दिवाळी व भाऊबीज एकाच दिवशी साजरी करण्याची प्रथा गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे.

या दिवाळीस करदोडा दिवाळी तसेच अंबई बुवाची दिवाई असे जुने लोक मानतात. अंबऋषी ची दिवाळी नावाने ओळखल्या जाणार्‍या या प्रथेमागे आख्यायिका अशी आहे की अनेक वर्षांपूर्वी येवती गावामध्ये दिवाळीच्या आधी काही दिवस आलेल्या साथीच्या आजारामुळे त्या काळात गावाशेजारील शेतात राहणारे अंबऋषी नामक संतांनी सर्व गावास शेतात आश्रय घ्यायला लावून या आजारापासून लोकांना वाचवले.

दिवाळीच्या. दिवशी सण साजरा करता नाही आला तरी त्यानंतर भाऊबीजेच्या पाठोपाठ येणारे चतुर्थी किंवा पंचमीस येणार्‍या पहिल्या सोमवारी किंवा शुक्रवारी या एकाच दिवशी दिवाळी व भाऊबीज साजरी करण्याचे गावातील लोकांना सांगितले. तेव्हापासून ही प्रथा आजतागायत कायम आहे.

या दिवशी गावाजवळील नामदेव वानखेडे (माळी)यांच्या शेतात असलेल्या अंबऋषींच्या मंदिरामध्ये सायंकाळी आरती होते आणि गावातील सर्व महिला आपापल्या घरचा नैवेद्य घेऊन मंदिरासमोरील शेतात एकत्र येतात आणि पणत्या लावतात आरती झाल्यानंतर अंबऋषीस करदोडा अर्पण करून बहिणी भावांना ओवाळतात.

यावेळी गावात फटाके फोडून मुले दिवाळी साजरी करतात. हा सण साजरा करण्यास विवाहित बहिणी गावात येतात तसेच नोकरी कामानिमित्त बाहेर गावी गेलेले लोक गावी येतात. येवती येथे साजर्‍या होणार्‍या या दिवाळीस आसपासच्या गावातील लोकसुद्धा सहभागी होत असतात.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com