...आणि आजीमाजी मंत्र्यांसह 18 उमेदवारांचा जीव पडला भांड्यात

खेमचंद महाजनांची याचिका फेटाळली
...आणि आजीमाजी मंत्र्यांसह 18 उमेदवारांचा जीव पडला भांड्यात

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्हा दूध संघाच्या (District Milk Union) निवडणुकीसाठी (election) ठराव केलेल्या आजी माजी मंत्र्यांसह (ministers) 18 उमेदवारांच्या (18 candidates) उमेदवारीवर (candidacy )असोदा येथील खेमचंद महाजन यांनी आक्षेप (objecting) घेत दाखल केलेली याचिका (Petition) औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad Bench)फेटाळून()Rejected लावली आहे. त्यामुळे या 18 उमेदवारांचा जीव आज भांड्यात पडला.

...आणि आजीमाजी मंत्र्यांसह 18 उमेदवारांचा जीव पडला भांड्यात
VISUAL STORY: होय....मी घटस्फोटासाठी अर्ज दिलाय.....

जिल्हा दूध संघाच्या निवडणूकीत राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे विरूध्द भाजपा अशी काट्याची टक्कर पहायला मिळणार आहे. गत आठवडाभरापासून झालेल्या राजकीय आरोपांमुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. माघारीच्या प्रक्रियेसाठी आता केवळ तीनच दिवस शिल्लक राहिले आहे. आत्तापर्यंत केवळ तीन उमेदवारांनी या निवडणूकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे अद्यापही माघारीच्या प्रक्रीयेकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

...आणि आजीमाजी मंत्र्यांसह 18 उमेदवारांचा जीव पडला भांड्यात
खरंच, आम्ही जळगाव जिल्हावासीय इतके ना-लायक आहोत?

महाविकास आघाडीची आज बैठक

जिल्हा दूध संघाच्या निवडणूकीसाठी राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. भाजपा आणि शिंदे गटातर्फे आज पारोळा येथे मेळावा घेण्यात आला. तर उद्या दि. 25 रोजी सकाळी 11 वा. जिल्हा बँकेच्या संचालिका अ‍ॅड. रोहिणी खडसे यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. या बैठकीत काय रणनिती ठरविली जाते याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

...आणि आजीमाजी मंत्र्यांसह 18 उमेदवारांचा जीव पडला भांड्यात
VISUAL STORY : हा विवाहित व्यावसायिक विश्वसुंदरी मानुषी छिल्लरला करतोय डेट

18 उमेदवारांना मिळाला दिलासा

जिल्हा दूध संघासाठी उमेदवारी करणारे मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार चिमणराव पाटील, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, संजय पवार, छाया देवकर यांच्यासह दिग्गजांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत.

या सर्वांच्या उमेदवारीवर असोदा येथील खेमचंद महाजन यांनी हरकत घेत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. ज्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत, ते त्या गावातील रहिवासी नाहीत. तसेच त्यांच्याकडून संघाला कुठल्याही प्रकारचा दूध पुरवठा होत नसून त्यांची नावे कुठल्याही यादीत नसल्याचे याचिकेत म्हटले होते.

ही याचिका दाखल झाल्यापासून आजी माजी मंत्र्यासह 18 जणांची उमेदवारी धोक्यात होती. मात्र खंडपीठाने खेमचंद महाजन यांची याचिका फेटाळून लावल्याने या सर्व 18 उमेदवारांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे. खेमचंद महाजन यांच्यातर्फे अ‍ॅड.सुरेखा महाजन यांनी तर मंत्र्यांसह आमदारांतर्फे अ‍ॅड.विनोद पाटील यांनी काम पाहिले.

माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार

जिल्हा दूध संघासाठी माघार घेण्यासाठी दि. 28 नोव्हेंबरपर्यंत अंतीम मुदत आहे. महाविकास आघाडी आणि भाजपाकडूनही माघारीच्या प्रक्रियेचा आढावा घेतला जात आहे. दि. 28 नंतर माघारीची प्रक्रिया आटोपल्यावरच जिल्हा दूध संघाच्या लढतीचे अंतीम चित्र स्पष्ट होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com