आनंदवार्ता : शिष्यवृत्ती परिक्षेत सांगवी जि.प. शाळेतील पाच विद्यार्थीं गुणवत्ता यादीत

चाळीसगाव तालुक्यातील जि.प. शाळेसाठी अभिमानास्पद बाब, जि.प.शाळा रोल मॉडेलसाठी आमदारांनी पुढाकार घ्यावा
आनंदवार्ता : शिष्यवृत्ती परिक्षेत सांगवी जि.प. शाळेतील पाच विद्यार्थीं गुणवत्ता यादीत

मनोहर कांडेकर

चाळीसगाव chaligaon प्रतिनिधी-

तालुक्यातील सांगवी येथील जिल्हा परिषदेच्या (ZP) उच्च प्राथमिक शाळेत पाच विद्यार्थ्यांनी पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती (Scholarship) परीक्षेत घवघवीत यश संपादन करत,गुणवत्ता यादीत (merit list) स्थान पटकवले आहे. तालुक्यासाठी ही अभिमानास्पद बाब आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून नुकताच प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करणायात आला असून त्यात सांगवी (ता. चाळीसगाव) येथील जिल्हा परिषद् उच्च प्राथमिक शाळेतील इयत्ता पाचवीतील पाच विद्यार्थानी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. यात कु. दिपाली चव्हाण, कु.तनु चव्हाण, कु. प्रियंका राठोड कु. मानव चव्हाण, कु. पवन राठोड या विद्यार्थ्याचा समावेश आहे. या विद्यार्थींनीना वर्गशिक्षक निलेश पाटील व अनिल चांदणे यांचे मार्गदर्शन लाभले. रांजणगाव केंद्राचे केंद्रप्रमुख शरद मोरे, शाळा व्यवस्थापन समिति सांगवी, शाळेचे मुख्याध्यापक विजय चौधरी व शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांनी यशस्वी विद्यार्थीचे व वर्गशिक्षक यांनी अभिनंदन केले आहे. तसेच तालुकाभरातून कौतूकांचा वर्षाव होत आहे.

जि.प.शाळा रोल मॉडेलसाठी आमदारांनी पुढाकार घ्यावा-

तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या गावाचा आत्मा आहेत. याच शाळेतून गुणवत्तापूर्ण विद्यार्थी बाहेर पडुन अनेक कार्यालयात आज उच्च पदावर काम करीत आहेत. गेल्या काही वर्षात तरुण शिक्षक मन लावून काम करीत असल्यामुळे विद्यार्थींच्या गुणवत्तेत भर पडली आहे. तालुक्यात गेल्या काही वर्षांत इंग्रजी शाळांचा गवगवा झाला असून या शाळा पालकांची आर्थिक लुट करीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा रोल मॉडेल करण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com