चिमुकल्यांची उभ्याने भरते शाळा; पोषण आहार ठेवायची पंचायत

चिमुकल्यांची उभ्याने भरते शाळा; पोषण आहार ठेवायची पंचायत

लालचंद अहिरे

जळगाव jalgaon।

जिल्ह्यातील 50 टक्केपेक्षा अधिक अंगणवाड्यांच्या छताला (roof of Anganwadis) पावसाळ्यात गळती (Leakage in rainy season) लागली असल्याने जागोजागी भांडे लावून पावसापासून बचाव करताना अंगणवाड्यातील मुलांची कसरत (Children's workout) सुरु आहे. त्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांची उभे राहूनच शाळा भरत (School is being held while standing) असून मुलांसाठी आलेल्या पोषण आहार (Nutritional diet) ठेवायची पंचायत होत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.

जळगाव जिल्ह्यात 3 हजार 641 अंगणवाड्या ग्रामीण भागात सुरु असून शहरी भागात 302 अंगणवाड्या आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जुन्या अंगणवाड्यांप्रमाणेच नव्या अंगणवाड्याची सुद्धा दयनीय अवस्था आहे. लहान बालकांसाठी उभारण्यात आलेल्या अंगणवाड्यांपैकी जुन्या व नव्यासह 50 टक्केपेक्षा अधिक अंगणवाड्या पावसाच्या पाण्याने छत गळतात.

त्यामुळे मुलांना बसायला जागा राहत नाही. तसेच लाभार्थी विद्यार्थ्यांना प्राप्त होणारा आहारही ठेवायला जागा राहत नसल्याचे चित्र ग्रामीण भागातील अंगणवाड्याची झालेली आहे. यासंदर्भात अंगणवाडी सेविकांनी गाव पातळीवर केलेल्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याचा प्रकार समोर येत आहे.

अपूर्ण कामे असतानाही पूर्णत्वाचा दिला जातोय दाखला

जिल्हा परिषदेकडून अंगणवाडी बांधकामासाठी पुरेसा निधी मिळत असल्याने अंगणवाडी बांधकामात या मंजुरीसाठी शिफारशी दिलेल्या असतात. परिणामी ठेकेदारांकडून काम करुन न घेता एजंटच या कामासाठी पुढे येतात. पुढार्‍यांचेच कार्यकर्ते काम करीत तेव्हा दुसर्‍या, तिसर्‍या टप्प्यावर काम होते. त्यामुळे कामाचा दर्जा व्यवस्थित नसल्याने परिणामी बांधकाम व्यवस्थित होत नाही.

बांधकामानंतर दरवाजे, खिडक्या वगैरेची कामे अपूर्ण अवस्थेत असतानाच काम पूर्णचा दाखला घेऊन बिले काढली जातात. एकदा बिल निघाले की, ही कामे तसेच अपूर्ण राहतात. अशा अपूर्ण अवस्थेतील कामे अंगणवाड्या सेविकांच्या ताब्यात दिले जातात.परिणामी अंगणवाडीसेविकांसह लहान बालकांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याची चर्चा रंगत आहे.

अंगणवाड्यांमध्ये ओलावा

अनेक अंगणवाड्यांच्या बांधकामांना बरेच वर्षे झाले असून अंगणवाड्या जुन्या झाल्यामुळे त्यांचा स्लॅबला गळती लागली आहे. भिंतींना तडे पडलेले आहेत. खालच्या फरशा तुटलेल्या आहेत. किचन, वाशरूमची अवस्था तर वाईटच झालेली आहे.अनेक अंगणवाड्यांना शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी रस्तेच नाहीत. अंगणवाड्यांच्या आजूबाजूला पाण्याचे डबके साचतात. काही अंगणवाड्यांच्या आजूबाजूला घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. या बाबीकडे वरिष्ठ अधिकार्‍यांचे दुर्लक्ष असल्यामुळे जिल्ह्यातील अंगवाडीसेविकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.

बांधकामासाठी प्रस्तवित असलेल्या अंगणवाड्या 255 असून लवकरच काही अंगणवाड्याची कामे पूर्णत्वाकडे येईल. मात्र,जिल्ह्यातील अंगणवाडीच्या छताला गळती, नादुरुस्त अंगणवाड्यांच्या दुरुस्तीसाठी स्थानिक पातळीवर खर्च करुन आवश्यक दुरुस्तीच्या सूचना दिलेल्या आहेत.

देवेंद्र राऊत,जिल्हा कार्यक्रम अधिकारी जि.प.जळगाव

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com