धावत्या रेल्वेखाली येऊन वृध्दाचा मृत्यू

धावत्या रेल्वेखाली येऊन वृध्दाचा मृत्यू

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

धावत्या रेल्वेखाली (running train) येवून विष्णू आसाराम भोई (वय-66, रा. गवळीवाडा, तांबापुर) या वृद्धाचा (old man) मृत्यू (died) झाल्याची घटना शहरातील रेल्वे स्थानक परिसरात मंगळवारी दुपाी 1 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील तांबापुरा परिसरातील गवळी वाडा परिसरात विष्णू भोई हे पत्नी, तीन मुलांसह वास्तव्यास होते. मंगळवारी दुपारी ते जळगाव रेल्वे स्थानकाच्या आवारामध्ये फिरत होते. दुपारी 1 वाजेच्या सुमारास रेल्वे स्थानकावरून सुरत-पुरी रेल्वे जात असताना अचानक तिच्या खाली येवून भोई यांचा मृत्यू झाला.

ही घटना लोहमार्ग पोलिस रामराव इंगळे यांना कळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळ धाव घेवून मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. भोई यांच्या खिशात मोबाईल आढळून आल्यानंतर इंगळे यांनी कुटूंबियांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

त्यानंतर मृतदेह जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आला. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com