दर्शन राजपूतने बनवले स्वदेशी विमान

दर्शन राजपूतने बनवले स्वदेशी विमान

खंडाळा, ता.भुसावळ । वार्ताहर Bhusawal

तालुक्यातील खडका या छोट्याशा गावी राहणारा दर्शन तर वडील रिक्षा चालक रणजितसिंह राजपूत व आई अनिता राजपूत आरोग्य सेविकाचे काम करून आपला कसा तरी उदरनिर्वाह चालवत आहे. पण म्हणतात न, देने वाला छप्पर फाड के देता है, तसेच खडका गावातील दर्शन राजपूत याने छंद म्हणून वयाच्या 18 व्या वर्षी स्वदेशी विमान (plane) व त्याचे रिमोट बनवले आहे व याची चर्चा सुरू आहे.

दर्शन रणजीतसिंग राजपूत हा सध्या इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन डिप्लोमाचा अभ्यास करित आहे व त्याला विमान, रिमोट कंट्रोल प्लेन आणि ड्रोन बनवण्याचा छंद हा लहानपणापासून व त्याला उडत्या वस्तूंची आवड आहे. दर्शनने एके दिवशी रिमोट कंट्रोल विमान बनवायचे ठरवले, ते बनवण्यासाठी त्याला खर्च खूप येणार व घरची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने दर्शन ने घरगुती जुगाड करून आरसी प्लेनसाठी रिमोट कंट्रोल स्वत: तयार केले आहे. विमान बनवण्यासाठी पैसे नव्हते म्हणून दर्शन हलके आणि टिकाऊ कमी किंमतीचे साहित्य शोधून एकत्र गोळा केले. थर्माकोल बॉक्सही या कामी पाहिजे होता तो थर्माकोलचा बॉक्स दर्शनने मासे विकणार्‍या दुकानदाराला थर्माकोल बॉक्ससाठी विचारले असता थर्माकोलच्या पेट्यांवर भारतात बंदी असल्यामुळे मासे विक्रेते दर्शनला द्यायला तयार नव्हते. मात्र दर्शन कसे तरी एक थर्मकोल मिळवण्यात यशस्वी झाला. त्यामुळे दर्शनचा आत्मविश्वास अजून दुपटीने वाढला, त्यानंतर दर्शनने देशी जुगाड करत बॉक्समधून 10 मि.मी.च्या थर्माकोल शीट्स बनवल्या, तसे हे काम काही सोपे नव्हते हे खूप वेळ घेणारे काम होते. तरी स्वदेशी विमानाचे विशिष्ट मॉडेल दर्शनला बनवायचे होते. त्याने विमानाची सूक्ष्म आकारात प्रतिकृती बनवण्याचा प्रयत्न केला.

विमानासाठी 1000 केव्ही ब्रशलेस डीसी मोटर त्याने वापरली. त्या मोटरला खूप जास्त करंट बॅटरीची गरज आहे. हे त्याच्या लक्षात येताच दर्शने ऑनलाइन बॅटरी शोधली आणि बॅटरीची किंमत दोन हजार रुपये इतकी होती. व दर्शन ला दोन हजार रुपये खर्च करणे अशक्य असल्याने त्याने कमी क्षमतेची वेगळी बॅटरी शोधली आणि ती बॅटरी त्याला सापडलीही. क्षमता कमी असल्याने त्याने तीच बॅटरी विकत घेतली ती 11.1व्ही ची बॅटरी बनवण्यासाठी फक्त सहाशे रुपये खर्च झाला. जेव्हा दर्शनचे स्वदेशी विमान पूर्ण झाले. तेव्हा चाचणीसाठी (विमान उडायला) तो विमान उडवायला खूप घाबरलो होतो. कारण मी पहिल्या उड्डाणाच्या आधी कधीही विमान उडवले नव्हते, त्याने लगेचच विमान क्रॅश केले. आणि त्याने प्रोपेलर तोडला विमानाने मग तरी दर्शनने जिद्द न हरता पुन्हा स्वदेशी विमान आपल्या अभ्यासाच्या व बुद्धीच्या जोरावर उडवण्यात यशस्वी झाला. यावेळी त्याचा आनंद गगनात मावेना. या अठरा वर्षाच्या दर्शन ने स्वदेशी विमान बनवून नवीन पिढीला संदेश दिला आहे. मोठं मोठ्या शहरात व कॉलेज मध्येच शिक्षण घेऊन शिकायला नाही मिळत तर ग्रामीण भागात व होतकरू मुलं ही अभ्यासाच्या जोरावर असे नवनवीन प्रयोग व उपक्रम राबवू शकतो. त्यासाठी मनात जिद्द व चिकाटी हवी एका रिक्षा चालकाचा मुलगा स्वदेशी विमान, रिमोट, अश्या वस्तू घर बसल्या व कमी खर्चात बनवू शकतो

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com