
एरंडोल- Erandole (वार्ताहर)
येथील म्हसावद रस्त्यावर असलेल्या बालाजी ऑइल मिलचे संचालक (entrepreneur) अनिल गणपती काबरे यांना वारंवार धमक्या देवून आठ लाखांची खंडणीची (Demand for ransom) मागणी करणाऱ्या आठ संशयिताना पोलिसांनी सापळा रचून खंडणी स्विकारताना अटक केली.संशयितांमध्ये पाच युवक एक महिला दोन मुलींचा समावेश आहे.
घटनेची चाहूल लागताच एक महिला तीन पुरुष चारही जणांनी दोन मोटार सायकलवरून जळगाव कडे पळ काढले असता सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे,हवालदार जुबेर खाटिक,महिला पोलीस ममता तडवी,होमगार्ड दिनेश पाटील यांनी त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करून महामार्ग पोलीस व पाळधी पोलीस स्टेशनच्या पोलिसांच्या सहकार्याने ताब्यात घेतले. दिनांक १६ जानेवारी २०२३ रोजी शहरातील प्रसिद्ध काबरा परिवारातील उद्योजक अनिल गणपती काबरे हे म्हसावद रस्त्यावरील आपल्या बालाजी ऑइल मिलवर असताना एक महिला व एका पुरुषाने तुमच्या ऑईल मिल बाबत शासकिय कार्यालयाकडे तक्रार करण्यात येईल असे दम भरले व सात ते आठ लाखांची खंडणीची मागणी केली.उद्योजक अनिल काबरे यांनी खंडणीची धमकी आल्यानंतर पोलीस स्टेशन ला तक्रार दिली. या प्रकरणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला .
खंडणी मागणीची करणारे खंडणी खोर खंडणीची रक्कम घेण्यासाठी १६ जानेवारी रोजी येणार असल्याची माहिती अनिल काबरे यांनी पोलिसांना दिली.पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव,सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे,उपनिरीक्षक शरद बागल हवालदार अनिल पाटील,मिलिंद कुमावत,संदीप पाटील,जुबेर खाटिक महिला पोलीस ममता तडवी,होमगार्ड दिनेश पाटील यांनी पंचांसह बालाजी ऑईल मिल येथे सापळा रचला. त्यावेळी दोन महिला व दोन पुरुष हे खंडणी मागण्यासाठी ऑईल मिलमध्ये आले.तर एक महिला व तीन पुरुष मिलच्या बाहेर उभे राहिले होते. मिलमध्ये आलेल्या आलेल्या खंडणीखोरां पैकी एका महिलेने उद्योजक अनिल काबरे यांचेकडून एक लाख रुपयांची खंडणी स्विकारताच पोलीस पथकाने महिले सह तिच्या साथीदारांना पकडले.
पोलिसांनी सहका-यांना पकडल्याची चाहूल लागताच मिलच्या बाहेर थांबलेल्या एक महिला व तीन पुरुष यांनी दोन मोटार सायकल वरून म्हसावद नाकामार्गे जळगावकडे पळून जाण्याचा प्रयत्न केला.सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे जुबेर खाटीक व त्यांच्या सहका-यांनी सिनेस्टाईल पाठलाग करून पाळधी पोलिसांच्या व महामार्ग पोलिसांच्या सहकार्याने त्यांना ताब्यात घेतले.
सर्व खंडणीखोरांना ताब्यात घेवून पोलीस स्थानकात आणले.पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे साक्षी राजू तायडे,रा.कुलकर्णी प्लॉट,धम्मनगर,भुसावळ,मोहिनी विनोद लोखंडे,रा.पिंपरी,पुणे ह.मुक्काम कुलकर्णी प्लॉट,धम्मनगर भुसावळ,शशिकांत कैलास सोनवणे,रा.द्वारकानगर,भुसावळ,सिद्धार्थ सुनील सोनवणे,रा.ताप्ती क्लब भुसावळ,रुपाली राजू तायडे,रा.धम्मनगर भुसावळ,आकाश सुरेश बोदडे रा.तळणी,ता.मोताळा,मिलिंद प्रकाश बोदडे हा न्युज २४ चा पत्रकार आहे .तळणी,ता.मोताळा,जि.बुलढाणा,गजानन आनंदा बोदडे रा.धम्मनगर भुसावळ असल्याचे सांगितले.
सर्व सातही खंडणीखोराना पोलिसांनी ताब्यात घेतले.दरम्यान पत्रकार मिलिंद बोदडे यांनी यापूर्वी देखील विविध शासकीय कार्यालयात वेगवेगळ्या नावाने बालाजी ऑईल मिल विरोधात तक्रारी करून अनिल काबरे यांचेकडून सुमारे ६० ते ७० हजार रुपये खंडणी घेतली आहे.सर्व संशयितांनी अनिल काबरे यांना मिलबाबत तक्रारी करण्याची धमकी देवून आठ लाख रुपयांची खंडणी मागितली होती.पोलिसांनी त्यांना आज सापळा रचून एक लाख रुपये स्वीकारताना ताब्यात घेतले.पोलिसांनी संशयितांकडून एक लाख रुपये रोख, एक डिझायर कार आठ मोबाईल,दोन मोटारसायकल असा १० लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
संशयितांमध्ये साक्षी राजू तायडे व मोहिनी विनोद लोखंडे यांचे वयाबाबत साशंकता असल्यामुळे त्यांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक जळगाव एम राजकुमार ,अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव रमेश चोपडे,उपविभागीय पोलीस अधिकारी अमळनेर राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या सहकार्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे व त्यांचे सहकारी तपास करीत आहेत.
दरम्यान बालाजी उद्योग समुहाचे काबरे परिवार यांच्याकडे खंडणी मागितल्याची माहिती शहरात समजताच एकाच खळबळ उडाली. या टोळी ने यापूर्वी राजकीय व सामाजिक क्षेत्राच्या व्यक्तीला ही अशा प्रकारे धमकी देऊन खंडणीची मागणी केल्याबाबत चर्चा आहे.