नात्याला काळीमा फासणारी घटना ; नराधम बापानेच केलं संतापजनक कृत्य

नात्याला काळीमा फासणारी घटना ; नराधम बापानेच केलं संतापजनक कृत्य

सावदा, ता.रावेर - वार्ताहर raver

महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. विकृत मानसिकता असलेल्यांकडूनच असे कृत्य घडताना दिसून येतात. असाच एक धक्कादायक प्रकार रावेर तालुक्यातील एका गावात घडला आहे. नराधम बापानेच स्वत:च्याच अवघ्या 13 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली असून नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे.

पोटच्या अल्पवयीन मुलीला ती भांडे धुत असताना बळजबरीने घरात ओढून नेत तिच्यावर अत्याचार केल्याच्या घटनेने बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारे संतापजनक कृत्य या नराधमाने केले. याबाबत पीडत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून नराधम बापाविरोधात सावदा पो.स्टे. ला गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सपोनी यांचे मार्गदर्शनाखाली होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com