प्रौढाची तलावात आत्महत्या

एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद ; तासभर सुरू होती शोध मोहीम
प्रौढाची तलावात आत्महत्या

जळगाव । प्रतिनिधी - Jalgaon

आजारपणाला कंटाळून आदर्श नगरातील इंदरलाल रामचंद्र कावना (वय-57) यांनी मेहरूण तलावमध्ये उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील आदर्श नगरात इंदलाल कावना हे वास्तव्यास होते. गेल्या काही महिन्यांपासून ते शरीरिराच्या काही व्याधीमुळे त्रस्त होते. त्याच व्याधींना कंटाळून बुधवारी सायंकाळी कावना यांनी मेहरूण तलावमध्ये उडी घेवून आपली जीवनयात्रा संपवली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्यातील चंद्रकांत पाटील, हेमंत कळसकर, नितीन पाटील यांच्यासह इतर कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेतली.

तासभरानंतर सापडला मृतदेह

पोलिसांनी घटनास्थळी धाव कावना यांचा मृतदेह शोधण्यासाठी शोध मोहिम सुरू केली. मात्र, मृतदेह मिळून येत नव्हता. काही वेळातच अग्नीशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या पथकातील देविदास सुरवाडे, रोहिदास चौधरी, भगवान पाटील, यांच्यासह विनोद ठाकरे, रवींद्र हटकर, मुजाहिद शेख यांनी मेहरूण तलावमध्ये तासभर शोध मोहिम राबवून मृतदेह बाहेर काढला.

नातेवाईकांची रुग्णालायत गर्दी

तलावातून मृतदेह बाहेर काढल्यानंतर तो शवविच्छेदमदतही जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आला. यावेळी नातेवाईकांची मोठया प्रमाणात गर्दी झाली होती. याप्रकरणी एमआयडीसी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com