तोंडापूर येथून दुचाकी चोरट्याच्या साथीदारालाही अटक

शहर पोलिसांची कामगिरी ः दोघांची कारागृहात रवानगी
तोंडापूर येथून दुचाकी चोरट्याच्या साथीदारालाही  अटक

जळगाव - jalgaon

शहरातून तब्बल १५ दुचाकी लांबविणार्‍या (Bicycle lengtheners) इब्राहीम मुसा तांबोळी (वय-२६) रा. तोंडापूर ता.जामनेर याचा साथीदार सुनील एकनाथ काळे वय ३६ रा. तोंडापूर ता. जामनेर याला शहर पोलिसांनी (City police) गुरुवारी पहाटे तोंडापूर (Tondapur) येथून अटक (Arrested) केली आहे. संशयित सुनील हा इब्राहीम याचा शेजारी असून इब्राहीम याने चोरलेल्या दुचाकी सुनील विकायचा, विक्रीतून आलेले पैसे दोघे वाटून घेत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

जळगाव शहर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील पोलिस कॉन्स्टेबल प्रणेश ठाकूर व पोलिस नाईक भास्कर ठाकरे या दोघांनी मंगळवार, २ नोव्हेंबर रेाजी दुचाकी चोरटा इब्राहीम मुसा तांबोळी यास गोलाणी मार्केट येथून अटक केली. त्याने जळगाव शहरातील गोलाणी मार्केटसह विविध ठिकाणांहून १५ दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून शहर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यामधील चोरीच्या १२ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. संशयित इब्राहीम यास एका दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

इब्राहीम याने चोरलेल्या दुचाकी त्याने सुनील काळे याच्यामार्फत विक्री केल्याची माहिती तपासात समोर आली होती. त्यानुसार शहर पोलीस स्टेशनेच पोलीस नाईक भास्कर ठाकरे, प्रणेश ठाकूर, विजय निकुंभ, व उमेश भांडारकर या कर्मचार्‍यांनी गुुरुवारी पहाटे तोंडापूर येथून सुनील काळे यास अटक केली.

दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

दरम्यान संशयित इब्राहीमच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला व अटकेतील संशयित सुनील काळे या दोघांना गुरुवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. दोघांची न्यायालयीन कोठडीत कारागृहात रवानगी करण्यात आली. इब्राहीम याने चोरलेल्या दुचाकी हा सुनील विकायचा. त्यानंतर आलेल्या पैशांमधून सुनील हा इब्राहीमला फक्त २ हजार रुपये द्यायचा व उर्वरीत पैसे स्वतः ठेवायचा अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान दोघांकडून आणखी दुचाकी हस्तगत होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com