पक्षातील मोजक्या जणांमध्ये हीनता,विकृती : आ.शिरीष चौधरी

अमळनेर पक्ष कार्यालयाच्या जागा विक्रीच्या वादात आ.शिरीष चौधरीनी केली प्रदीप पवार यांची पाठराखण
पक्षातील मोजक्या जणांमध्ये  हीनता,विकृती : आ.शिरीष चौधरी

रावेर Raver|प्रतिनिधी-

पक्षातील (party) मोजक्या जणांमध्ये हीनता,विकृती (Inferiority, Deformity) आहे अशांना खड्यासारखे उचलून बाहेर फेकावे (Throw out) लागेल, ती तयारी ठेवावी तरच उपयोग होणार आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (District Bank Election) पक्षाच्या भूमिकेच्या विपरीत वागले त्यांना जाब विचारला पाहिजे. नुसत तोंड वासून बघत बसून चालणार नाही.असा घणाघात आ. शिरीष चौधरी (MLA Shirish Chaudhary) यांनी पक्षाअंतर्गत कुरघोडी (Kur mare) करणाऱ्या पदाधिकारी यांच्यावर केला आहे.

येथील कॉंग्रेस कमेटीच्या कार्यालयात मुंजलवाडी सरपंच योगेश पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

अमळनेर पक्ष कार्यालयाच्या जागेबाबत इतकी वर्ष काळजी कुणाला नव्हती,जिल्हाध्यक्ष यांच्या सुचनेवरून एक नोटीस काढली असता,तुम्ही हे कस काय केले? याबाबत पक्षाकडून विचारणा झाली.जिल्ह्यातून तक्रारी करण्यात आल्या.ज्यांनी २५-३० वर्ष इमादारीने कामे केली,जो माणूस पक्षाकरीता झटला तो जागा विकून खड्गी भरणार आहे का?.त्याला भिक लागली आहे.तेवढी जागा विकून त्याचा उदार निर्वाह होईल का ? आज काही जण तारतम्य न बाळगता,पद आहे अधिकारी आहे,म्हणून काहीही बोलायचं काहीही तक्रारी करत आहे.

त्यांनी त्यांच्या भाषणातून रावेर कॉंग्रेस कमेटीची जागेबाबत कुणाला लबाडी करू देणार नाही,विकू देणार नसल्याची ग्वाही दिली.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार,नगराध्यक्ष दारा मोहम्मद,युवक जिल्हाध्यक्ष हितेंद्र पाटील,डॉ सुरेश पाटील,माजी नगराध्यक्ष हरिष गनवाणी,बाजार समितीचे माजी सभापती डॉ राजेंद्र पाटील,पितांबर पाटील,डी सी पाटील,गोंडू महाजन,धनंजय चौधरी,पंचायत समिती सदस्य योगेश पाटील,योगेश गजरे,राजीव सुवरणें,कांता बोरा,अतुल पाटील,महेंद्र पवार,प्रशांत पाटील,भुपेंद्र जाधव,मिलिंद पाटील,कैलास वाणी,गुणवंत सातव,वाघोड सरपंच संजय माशाने,वर्षा महाजन,श्रीमती पाठक व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डॉ सुरेश पाटील,धनंजय चौधरी डॉ.राजेंद्र पाटील,युवक जिल्हाध्यक्ष हितेंद्र पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.

जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी पक्षाअंतर्गत त्यांच्यावर रान पेटवनाऱ्याना ते भिक घालत नसल्याचे यावेळी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सूरदास,मानसी पवार यांनी केले.तर आभार योगेश गजरे यांनी मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com