मोबाईलने केला घात : भरधाव ट्रक झाडावर आदळून चालक झाला ठार

मोबाईलने केला घात :  भरधाव ट्रक झाडावर आदळून चालक झाला ठार

यावल Yaval प्रतिनिधी

येथील यावल चोपडा (Yaval Chopda) राज्य मार्गावरील (State Road) रस्त्यावर (road) वाहनचालकाचा (driver) वाहनावरून ताबा (Losing control of the vehicle) सुटल्याने झालेल्या  भिषण अपघातात (terrible accident एकाचा मृत्यु (death of one) झाला असुन , पोलीस ठाण्यात (police station) अपघाताची नोंद (Accident report) करण्यात आली आहे.   

  या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीती अनुसार दिनांक ९ नॉव्हेबरच्या रात्री ९ वाजता यावल चोपडा मार्गा वरील केसरबाग हॉटेल जवळ ट्रक वाहन चालक राजु गोविंदसिंग ( गब्बर भाई ) राहणार इधलपुर तालुका मणिया जिल्हा धौलपुर ( राजस्थान ) हा त्याच्या ताब्यातील टाटा कंपनीची १० चाकी मालट्रक वाहन क्रमांक आरजे ११जीए ७३८०हे वाहन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत चालवत हाोता.

वाहन चालवतांना तो मोबाईलवर बोलत असतांना त्याचा स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने मालट्रक एका झाडावर आदळून अपघात झाला. दरम्यान चालकाने चालत्या ट्रकमधून उडी मारून जीव वाचवण्यचा प्रयत्न केला.

मोबाईलने केला घात :  भरधाव ट्रक झाडावर आदळून चालक झाला ठार
चाळीसगाव तालुक्यात 16 ग्रामपंचायतीच्या निवडणुका रंगणार

मात्र या भिषण अपघातात तो स्वत: गंभीर जखमी होत मरणास व वाहनाच्या नुकसानीस कारणीभुत ठरला आहे .

याबाबत महावीर कन्हैलाल राजपुत (वय २८वर्ष) राहणार ईधलपुर तालुका माणिया जिल्हा धौलपुर ( राजस्थान ) यांनी यावल पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने वाहनचालक राजु गोविंदसिंग यांच्या विरूद्ध भादवी कलम३o४ ( अ ) २८९ , ३३७, ३३८ कलमासह मोटर वाहन कायदा नियम १८४ ( सी ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन , या अपघाताचा तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे .

मोबाईलने केला घात :  भरधाव ट्रक झाडावर आदळून चालक झाला ठार
Visual Story # क्रितीचा ‘ठुमकेश्वरी’ अंदाज पाहिलात का?
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com