युपीएससी परीक्षेत अमळनेरच्या तुषार पाटीलचे दैदीप्यमान यश

देशात 72 व्या क्रमांकाने उत्तीर्ण
युपीएससी परीक्षेत अमळनेरच्या तुषार पाटीलचे दैदीप्यमान यश

अमळनेर - amalner

भारत सरकारने यूपीएससी मार्फत घेतलेल्या सीडीएस (combined Defence services Examination 2021) परीक्षेचा निकाल दि.24 डिसेंबर 2021 रोजी जाहीर करण्यात आलेला असून या परीक्षेत रंजाणे (तालुका अमळनेर) (amalner) येथील तुषार मच्छिंद्र पाटील (Tushar Machhindra Patil) याने दैदीप्यमान यश संपादन केले आहे.

तुषार पाटील इंडियन मिलिटरी ॲकेडमीमध्ये देशात 72 वा तर भारतीय नौदलात 42 वा क्रमांक पटकाविला आहे. त्यामुळे तुषार याला भारतीय सैन्यदलात थेट लेफ्टनंटपदी विराजमान होऊन देश सेवेकरिता उच्च पदावर कर्तव्य बजावण्याची संधी प्राप्त झाली आहे.

तुषारने पहिल्याच प्रयत्नात वयाच्या एकविसाव्या वर्षी सदरचे यश प्राप्त केले असून त्यामुळे सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे व अमळनेरचे नाव देशात उंचावलेले आहे. तुषारचे वडील मच्छिंद्र दोधू पाटील हे देखील सीआरपीएफ दलात सब इन्स्पेक्टर म्हणून जम्मू कश्मीर येथे देशसेवा बजावीत आहेत. तुषार हा माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड व्ही.आर.पाटील यांचा नातू आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com