अमळनेरचा अट्टल गुन्हेगार अमरावती येथे स्थानबद्ध

दादू धोबी, विशाल सोनवणे, शुभम देशमुख उर्फ दाऊद पाठोपाठ केली चौथी कारवाई
अमळनेरचा अट्टल गुन्हेगार अमरावती येथे स्थानबद्ध

अमळनेर Amalner प्रतिनिधी

अमळनेर शहरातील (Amalner city) दलाली करणारे तसेच सट्टा जुगाराचा खेळ खेळविणे शासकीय कामात अडथळा करून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यासाठी, स्फोटक पदार्थ व हत्यार जवळ बाळगून असलेला गुन्हेगार (criminal) रफिक उर्फ काजल शेख रशीद याला अमरावती सेंट्रल जेल (Amravati Central Jail)येथे स्थानबद्ध (Positioned) करण्यासाठी रवाना करण्यात आले आहे. अमळनेरात ही चौथी कारवाई असून या आधी दादू धोबी, विशाल सोनवणे, शुभम देशमुख उर्फ दाऊद यांच्यावर हद्दपारीची कारवाई झाली आहे. त्यामुळे गुन्हेगारांना चांगलीच जरब बसली आहे.

अमळनेरचा अट्टल गुन्हेगार अमरावती येथे स्थानबद्ध
Bad News photos # पूणे मेहकर बसच्या अपघातात सहा जण ठार

अमळनेर शहरतील गांधलीपुरा सारख्या  संमिश्र वस्तीत संवेदनशील भागात वेश्या व्यवसायात दलाली करून (रेड लाईट) बाहेरून येणारे लोकांना वेठीस धरून त्यांना माराहाण करून लूटमार करणे अशी गुन्हेगारी सुरू होती. तसेच शासकीय कामात अडथळा त्यांना जिवेनिशी ठार मारण्याचा प्रयत्न तसेच न्यायालयातील आवारात वकीलावर हल्ला करणे तसेच सट्टा पत्ता (जुगार) करून लोकांना लुटणे किंवा त्यांच्यावर हल्ला करून आणि स्फोटक पदार्थ व हत्यार जवळ बाळगून दहशत निर्माण करीत होते.

अमळनेरचा अट्टल गुन्हेगार अमरावती येथे स्थानबद्ध
चार युवकांचा पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

त्यापैकी दादू धोबी उर्फ राजेश एकनाथ निकुंभे तसेच अत्यंत दहशत व गुन्हेगारी करणारा शिवम उर्फ शुभम उर्फ दाऊद मनोज देशमुख तसेच विशाल विजय सोनवणे या तिन्ही गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टी वाले व औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन व्यक्ती आणि वाळू तस्कर तसेच अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालने बाबतचा अधिनियम 1981 प्रमाणे या तिन्ही आरोपींवर या कायद्यानंतर्गत कारवाई करून त्यांना नाशिक रोड सेंट्रल, नागपूर सेंट्रल जेलमध्ये स्थानबद्धेची मोठी व परिणामकारक कारवाई अशा तीन कारवाई करण्यात आल्या होत्या.

अमळनेरचा अट्टल गुन्हेगार अमरावती येथे स्थानबद्ध
गावठी कट्टा घेऊन फिरणारा बोदवड पोलिसांकडून जेरबंद

त्यात पुन्हा आता रफिक उर्फ काजल शेख रशीद (वय वर्ष ३७ राहणार गांधलीपुरा अमळनेर) अमळनेर पोलिसांनी सोमवारी चौथी धक्कादायक हद्दपारीची कारवाई केली.  त्यास अमरावती सेंट्रल जेल येथे स्थानबद्ध करण्यासाठी रवाना करण्यात आले आहे.रफिक उर्फ काजलची अशी आहे गुन्हेगार पार्श्वभूमीरफिक उर्फ काजल याच्यावर आज पावेतो दखल पात्र एकूण ११ गुन्हे, अदखल पात्र एकूण ०६ गुन्हे, महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदे अंतर्गत एकूण ११ गुन्हे दाखल आहेत. तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ (१) (ब) प्रमाणे हद्दपार एकूण ४ वेळेस तर एकूण ०५ वेळेस प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती.

सदरील आरोपीवर दाखल गुन्ह्यांपैकी प्रामुख्याने जबरी चोरी करणे, खंडणी मागणे, धारदार शस्त्र, बंदुकीचा वापर, स्फोटक पदार्थ जवळ बाळगून आणि मारहाण करून गंभीर दुखापत करणे, जातीयवादी गुन्हे करणे, दंगल माजवून गर्दी करून शस्त्र जवळ बाळगून लोकांमध्ये दहशत घालणे, बंदुकीचा धाक दाखवून जबरी चोरी करणे, एवढेच नव्हे तर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे तसेच शासकीय कामात अडथळा करणे.आदेशांचे करीत होता उल्लंघनहा धोकादायक इसम हा हद्दपार करून तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील आदेशाचे पालन करीत नव्हता. तसेच अनेक वेळा त्याचे चांगले वर्तणुकीचे बॉण्ड घेऊन देखील त्याचे तो पालन करत नव्हता. कोणत्याही प्रकारच्या कायद्याची त्यास भीती राहिलेली नव्हती.

त्याच्या गुन्हेगारी वृत्तीने त्याने लोकांची मालमत्ता व जीवित धोक्यात आणले होते. तसेच शासकीय कामात नेहमी अडथळा निर्माण करत होता तसेच न्यायलायची प्रतिष्ठा न बाळगता वकील कामकाज करणारे नामांकित वकिलावर हल्ला करणे तसेच शासकीय कर्मचाऱ्यांवर जातीय व त्याच्या संपर्कात असलेल्या महील्या यांना पुढे करून धमक्या देऊन त्यांच्यावर मानसिक व शारीरिक हल्ला करीत होता. रफिक उर्फ काजल शेख रशीद याच्यावर अमळनेर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे त्याच्या क्रूर कृत्यांना व खुनशी वृत्तीला या सर्व स्तरावरील लोक, महिला शासकीय कर्मचारी कारवाईमुळे सुखावले आहेत व सुरक्षितपणाची भावना त्यांच्या मनात तयार झाली आहे. 

कारवाईत यांची मोलाची कामगिरी

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला चार्ज घेतल्यापासून अवघ्या पाच महिन्यात अमळनेर शहरातील अट्टल गुन्हेगारांवर ४ गुन्हेगारांवर एम. पी. डी. ए. च्या कारवाई केली  आहे. या कारवाई करताना प्रामुख्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पोलीस अंमलदार किशोर पाटील, दीपक माळी, रविंद्र पाटील, शरद पाटील, सिद्धांत सिसोदे, सहा.पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी,विकास शिरोळे, बापू साळुंखे, कपिल पाटील, सुनिल पाटील, योगेश श्रावण पाटील, घनशाम पवार, जितेंद्र निकुंभे, हर्षल पाटील, मिलिंद बोरसे, नाजिमा पिंजारी, नम्रता जरे, होमगार्ड कैलास पाटील या सर्वांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नजन पाटील यांची मदत व पाठपुरावा खूप मोलाचा आहे. तसेच त्यांचे सहकारी पोलीस हवालदार सुनील दामोदरे यांनी देखील या कारवाईमध्ये काम केले आहे.

यांच्या मार्गदर्शनाखाली केली कारवाई

जिल्ह्यातील अशा प्रकारच्या गुन्हेगारांना परिणामकारक कारवाई केली पाहिजे यासाठी  पोलीस अधीक्षक जळगाव एम राज कुमार  यांनी तसे आदेश दिले होते. त्यावरून अमळनेर पोलिसांनी अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव रमेश चोपडे व उपविभागीय पोलीस अधिकारी अमळनेर भाग अमळनेर राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावी कारवाई करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com