BREAKING NEWS : अपघातग्रस्त एस.टी.बसचे चालक-वाहक अमळनेरचे ; १३ प्रवाशांचा मृत्यू

BREAKING NEWS : अपघातग्रस्त एस.टी.बसचे चालक-वाहक अमळनेरचे ; १३ प्रवाशांचा मृत्यू

जळगाव/अमळनेर amalner

इंदूरवरून अमळनेर येथे येणारी अमळनेर डेपोची बस ही मध्यप्रदेशातील खरगोन आणि धार जिल्ह्याच्या सीमेनजीक नर्मदा नदीत कोसळल्याने मोठा अपघात झाला आहे. या बसमध्ये ५० ते ५५ प्रवाशी असल्याची माहिती समोर येत आहे.

अपघातग्रस्त बस जळगाव जिल्ह्यातील अमळनेर डेपोची असून या बसचे चालक चंद्रकांत एकनाथ पाटील व वाहक प्रकाश श्रावण चौधरी असे नाव आहे.

पंढरपूरहून आल्यानंतर बस गेली होती इंदोरला

ही बस पंढरपूर जाऊन आल्यावर इंदोर पाठवली होती. बस ड्रायव्हर ढेकू रोडवरील गायत्री नगर येथील रहिवासी आहेत.

तांत्रीक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. सविस्तर असे की, अमळनेर डेपोची अमळनेर ते इंदूर या मार्गावर बससेवा आहे. अमळनेर डेपोची एमएच ४० एन ९८४८ क्रमांकाची बस ही इंदूर येथे गेली होती.

तेथून रिटर्न प्रवासात खरगोन आणि धार या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असणार्‍या कलघाट गावाजवळ नर्मदा नदीच्या पात्रात ही बस रात्री कोसळली. यातील काही प्रवासी बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com