रस्तालुट करणारी टोळी अमळनेर पोलिसांच्या ताब्यात

रस्तालुट करणारी टोळी अमळनेर पोलिसांच्या ताब्यात

अमळनेर (Amalner) प्रतिनिधी

अमळनेर चोपडा रोडवर झालेल्या रस्त्यालुट करणाऱ्या तीन जणांना अमळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले असून तीन जणांचा शोध पोलीस घेत आहेत.

अमळनेर चोपडा रोडवरील नवीन रेल्वे पुला जवळ 5 नोव्हेंबर रोजी सहा जणांनी रस्त्यावर लोखंडी रॉड व मोठमोठे दगड रस्त्यावर टाकून एका टँकर चालकाला मारहाण करून त्याची लूट केली होती.याबाबत अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अश्याच प्रकारचे गुन्हे आधी घडले होते मात्र याबाबत कोणीही तक्रार दाखल केलेली नव्हती.

तर लुटीमारी करणारी टोळी विरुद्ध कोणताही पुरावा उपलब्ध होत नव्हता पथकातील पोलीस उपनिरीक्षक राकेशसिंग परदेशी, पोलीस नाईक मिलिंद भामरे, सुर्यकांत साळुंखे,पोलीस कॉन्स्टेबल राहुल पाटील, राजेंद्र देशमाने, आदींनी असे गुन्हे करणारे गुन्हेगारांची कार्यपद्धती तपासली. याबाबत एकाची विचारपूस केली असता त्याने पथकाला उडवाउडवीची उत्तरे दिली होती.

पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी त्यास विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने दिलेल्या माहितीनुसार अजून दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या तीन जणांचा शोध सुरू असल्याने ताब्यात घेतलेल्या आरोपीची नावे पोलीस पथकाने जाहीर केले नाहीत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com