108 रुग्णवाहिकेने वाचवले हरणाचे प्राण

जखमी हरणावर अमळनेर पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार
108 रुग्णवाहिकेने वाचवले हरणाचे प्राण

अमळनेर - Amalner :

तालुक्यातील डांगर गावाजवळ अज्ञात वाहनाने हरणाला जखमी केले. ही घटना दि.22 रोजी 9.30 वाजेच्या सुमारास घडली. याठिकाणी जानवे रूग्णालयातील 108 रुग्णवाहिका उभी होती.

मात्र यात हरिण घेऊन जाण्यास असमर्थता दर्शविली. तसेच जखमी हरणाला खासगी वाहनचालक अमळनेरला घेऊन येण्यास देखील तयार नव्हते.

त्याचवेळी जळगावकडे येत असतांना ‘देशदूत’चे संपादक हेमंत अलोने, जाहिरात व्यवस्थापक प्रदीप जाधव, वितरण व्यवस्थापक विजय महाजन यांच्या निदर्शनास आली.

त्यानंतर त्यांनी जिल्हा समन्वयक डॉ.राहुल जैन यांना घटनेची माहिती देऊन सदर जखमी हरणाला अमळनेरला पशुवैद्यकीय रुग्णालयात सोडण्याची विनंती केली.

तात्काळ 108 रुग्णवाहिकेतील डॉ.शोएब अन्सारी, पायलट किरण पारधी यांनी रुग्णालयात आणले. पशुवैद्यकीय सहायक डॉ.जी.ए.मोरे यांनी उपचार केले. त्यांना शुभम शेटे, बंटी भामरे, गौरव वाघ यांनी मदत केली.

तात्काळ उपचारामुळे वाचले प्राण

जखमी हरणावर अमळनेरच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार करावा म्हणून डॉ.मोरे यांच्याशी पत्रकार राजेंद्र पोतदार, संजय पाटील यांनी संपर्क करून तयारी केल्याने अमळनेरला जखमी हरणावर त्वरित उपचार करता येणे शक्य झाल्याने हरणाचे प्राण वाचले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com