आठवणीच्या सुवर्णक्षणांत रमले भादलीच्या महात्मा गांधी विद्यालयाचे माजी विद्यार्थी

(छाया -अरुण पाटील यावल )
(छाया -अरुण पाटील यावल )

यावल Yaval ( प्रतिनिधी ) -

भादली बुll ता . जि. जळगांव येथील महात्मा गांधी विद्यालयात (Mahatma Gandhi Vidyalaya) सन 2003 च्या माजी विद्यार्थ्यांनी (Alumni) तब्बल अठरा वर्षानंतर एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. या एक दिवसीय स्नेहमेळाव्यात (Get together) सर्वांनी आपले बालपण पुन्हा एकदा अनुभवले. शालेय जीवनानंतर वेगवेगळ्या दिशांना पांगलेल्या मित्र-मैत्रिणींनी वयाची बंधने झुगारून या एकत्रीकरणाच्या सोहळ्याचा आनंद घेतला.

भादली बुll येथे महात्मा गांधी विद्यालयात दहावीच्या 2003 च्या माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या थाटात " आठवणींचे सुवर्णक्षण: उत्सव मैत्रीचा" या उपक्रमाअंतर्गत स्नेह मेळावा आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रुरल एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन गोविंदा भाऊ महाजन होते तसेच सोसायटीचे व्हाईस चेअरमन, सेक्रेटरी, जॉइंट सेक्रेटरी, व इतर सभासद हेसुद्धा व्यासपीठावर उपस्थित होते .

महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक डि.के. धनगर सर, एस. पी. ठाकूर सर, पी.जी. बागुल सर, गणेश चव्हाण सर, श्री. तायडे, डी .आर. सोनवणे सर, पौर्णिमा पाटील मॅडम, बोंडे मॅडम, सविता मॅडम, पाचपांडे मॅडम, हेमा ताई या सर्वांची उपस्थिती होती या स्नेहमेळाव्याचे प्रमुख अतिथी पद विजय पवार शिक्षण विस्तार अधिकारी शिक्षण विभाग , जिल्हा परिषद यांनी भूषविले .विद्यार्थी प्रतिनिधित्व नगरसेविका गायत्री राणे व ह भ प सूर्यभान जी महाराज तसेच ललित सपकाळे यांनी भूषविले.

दीपप्रज्वलनानंतर विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. सर्व उपस्थित मान्यवरांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला नंतर काही विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मनोगतात द्वारे आपल्या आठवणींना वाट मोकळी करून दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती सोनवणे व प्रीती रडे यांनी केले तर आभार प्रदर्शन पुनम नेमाडे यांनी व्यक्त केले. स्नेह मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी माजी विद्यार्थी कुशल, चंदन ,कुंदन, निलेश, उमेश, दीपक, सुभाष, जितू, हेमराज, मनोज, शेखर, ज्योती ,माधुरी, दिपाली व इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com