एकनाथ शिंदेंसोबत जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन आमदार

आ. चिमणराव पाटलांशी संपर्क तर किशोर पाटील ‘नॉट रिचेबल’
एकनाथ शिंदेंसोबत जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन आमदार

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

राज्याचे नगरविकास मंत्री (Minister of State for Urban Development) तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारले (Rebelled) असुन त्यांच्यासमवेत 30 हून अधिक आमदार (More than 30 MLAs) असल्याची माहिती समोर आली आहे. यात जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon district) शिवसेनेचे (Shiv Sena) दोन आमदार (two MLAs) शिंदेंसमवेत सुरत येथे असल्याची माहिती मिळाली आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. तसेच या बंडामुळे ठाकरे सरकारही संकटात सापडले आहे. विधानपरिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे हे अचानक ‘नॉट रिचेबल’ झाले होते. त्यांच्या सोबत 30 हून अधिक आमदार असल्याची माहिती समोर आली. शिवसेनेकडून शिंदेंची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहे. दरम्यान शिंदेंसमवेत जळगाव जिल्ह्याती कोण आमदार आहेत याविषयी मंगळवारी दिवसभर चर्चा रंगली होती.

जिल्ह्यातील चार पैकी दोन आमदार शिंदेंसोबत

जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, (Guardian Minister Gulabrao Patil,)आमदार लताताई सोनवणे (MLA Latatai Sonawane), आमदार चिमणराव पाटील (MLA Chimanrao Patil) आणि आमदार किशोर पाटील (MLA Kishore Patil) असे चार आमदार आहेत. यापैकी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते मुंबईतच असून मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला हजर होते. तर आमदार लताताई सोनवणे ह्या खासगी कामानिमीत्त दिल्ली येथे असल्याचे माजी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी सांगितले.

पारोळा-एरंडोल मतदारसंघाचे आमदार चिमणराव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते एकनाथ शिंदे यांच्यासमवेत सुरत येथे असल्याचे खुद्द त्यांनीच सांगितले. तर पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील मात्र यांचा फोन सकाळपासूनच ‘नॉट रिचेबल’ असल्याचे सांगण्यात आले. त्यांचे स्वीय्य सहायक राजू पाटील यांच्याशी संपर्क साधला असता आमदार किशोर पाटील यांच्याबाबत माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com