आर्थिकतेसोबतच सामाजिक आणि निती यांचा विचार आवश्यक

अर्थतज्ज्ञ डॉ.विनायक गोविलकर
आर्थिकतेसोबतच सामाजिक आणि निती यांचा विचार आवश्यक

जळगाव jalgaon

भारतीय अर्थचिंतनाची (Indian semantics) स्वीकारार्हता (Acceptability) जगाच्या पातळीवर (global scale) वाढली असून आर्थिकतेसोबतच(economics) सामाजिक आणि निती (social and policy) यांचा विचार आवश्यक वाटू लागला असल्याचे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ डॉ.विनायक गोविलकर (Economist Dr. Vinayak Govilkar) यांनी केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील (Poet Bahinabai Chaudhary North Maharashtra University)पंडित दिनदयाल उपाध्याय अध्यासनाच्यावतीने (Pandit Deendayal Upadhyay Adhyasan) शनिवारी पंडित दिनदयाल उपाध्याय जयंतीनिमित्त डॉ.गोविलकर यांचे भारतीय आणि अभारतीय आर्थिक चिंतन याविषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.

प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.बी.व्ही.पवार अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख अतिथी म्हणून व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ.एस.आर.भादलीकर उपस्थित होते.

यावेळी बोलतांना डॉ.गोविलकर यांनी भारतीय आणि अभारतीय अर्थव्यवस्थेतील फरक विशद केला. अभारतीय अर्थशास्त्राचा आधार माणूस हा आर्थिक मानव आहे. आर्थिक व्यवहार करणारे पूर्णत: तर्कसंगत असले तरी त्यातील आर्थिक विचार वस्तू, सेवा, साधने, उपकरणे यांच्या संग्रह ऐवजी पैशांचा संग्रह सांगणारे आहे.

स्पर्धा, व्यक्ती स्वातंत्र, शासनाचा किमान हस्तक्षेप आणि संपत्तीची खाजगी मालमत्ता हे आधुनिक अर्थशास्त्राचे स्तंभ आहेत. त्याचा परिणाम असा झाला की, उपभोगवाद हा प्रचंड वाढला. अनियमित स्वार्थ आणि संघर्ष वाढल्याने शांती व सुख मिळेनासे झाले. पैसा साधन न राहता साध्य बनले. या उलट भारतीय अर्थचिंतनात साधे, सोपे, समृध्द आणि सुंदन जीवन जगता यावे हा पाया आहे.

गरजा वाढल्या तरी संयम हवा, साधने मर्यादित असाव्यात पण अपव्यय होऊ नये, स्पर्धा नको तर सहाय्य हवे आणि गरजा केवळ शारिरीक नसून मानसिक, बौध्दिक आणि आत्मिक आहेत असे सांगितले गेले आहे. जगाच्या पातळीवर ज्यांना आर्थिक विषयातील नोबेल पारितोषिक प्राप्त झाले. त्यांच्या मांडणीत भारतीय अर्थचिंतनाचाच गाभा दिसून येतेा असे ते म्हणाले.

अध्यक्षीय भाषणात प्रा.बी.व्ही.पवार यांनी कोरोनामुळे जगासमोर मोठे आर्थिक संकट उभे टाकले असून ते पेलण्याची जबाबदारी सगळयांची असल्याचे सांगितले. दिलीप पाटील यांनी आपल्या भाषणात पंडित दिनदयाल उपाध्याय यांनी शेवटच्या माणसाचा विकास व्हावा ही संकल्पना मांडली आणि त्याच धर्तीवर या विद्यापीठाकडून शेवटच्या व्यक्तीचा विचार करुन उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले.

प्रास्ताविकात अध्यासनाचे संचालक प्रा.विवेक काटदरे यांनी अध्यासनाची माहिती दिली. पाहुण्यांचा परिचय जगदीश पाटील यांनी करुन दिला. सुभाष पवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुन आभार मानले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com