नशिराबादला उद्या हाेणार रेशनकार्डसह 12 अंकी क्रमांकाचे वाटप

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उपक्रम
नशिराबादला उद्या हाेणार रेशनकार्डसह 12 अंकी क्रमांकाचे वाटप
USER

नशिराबाद - nashirabad

नशिराबाद गावातील नागरिकांना रेशन कार्ड (Ration card) संबंधित असलेल्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (Nationalist Congress Party) वतीने गेल्या जुलै 2021 पासून प्रयत्न सुरू आहेत. गावातील सुमारे 1500 कुटुंबांना नवीन व दुय्यम रेशन कार्ड बनवून देण्यात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीला यश आले आहे.

तसेच 9505 लोकांना 12 अंकी ऑनलाईन प्रणालीत समाविष्ट करून47250 किलो धान्य नशिराबाद गावासाठी मंजूर करण्यात आले कुटुंबांचे नावे (Online and offline) ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने वाढविण्यात व कमी करण्यात पार्टीच्या कार्यकर्त्यांना यश आले.

वर्षानुवर्षांपासून वरील समस्या लोकांना भेडसावत होत्या. समस्या सोडविताना वैयक्तिक नागरिक अनेक अडचणींना तोंड देत होते. त्यावर फार मोठ्या प्रमाणात नागरिकांची आर्थिक फसवणूक होत होती. पैसे घेऊनही काम होत नव्हती या सर्व बाबी लक्षात घेऊन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नशिराबाद शहराच्या वतीने (Tehsildar) तहसीलदार जळगाव यांना निवेदन देऊन समस्या सोडविण्यासाठी 9 ऑगस्ट क्रांती दिना पर्यंतची मुदत देण्यात आली. नऊ ऑगस्ट क्रांतिदिनी नशिराबाद ते जळगाव तहसील कार्यालयापर्यंत पायी चालत जात दांडी मार्च आंदोलन करण्यात आले. नागरिकांची ही कागदपत्रे जमा करून शासकीय शुल्क स्वीकारत जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले.

सर्व प्रयत्न फळास लागून समस्या नागरिकांच्या आयुष्यात अमुलाग्र व सकारात्मक बदल घडविणारे हे कार्य तातडीने केले. फेब्रुवारी महिन्यापासून नशिराबाद कर नागरिकांना याचा प्रत्यक्षात फायदा होणार आहे.

रेशन कार्ड व 12 अंकी क्रमांक वाटप कार्यक्रमास माजीमंत्री (Eknathrao Khadse) एकनाथराव खडसे, जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर (Gulabrao Deokar) यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या दि.18 फेब्रुवारी शुक्रवार रोजी सायंकाळी 7 वाजता होळी मैदान खालची आळी येथे संपन्न होत आहे. नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नशिराबाद शहरच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com