पालकमंत्र्यांसह सेनेेच्या चारही आमदारांचे कमबॅक होणार!

जिल्हाप्रमुखांसह पदाधिकार्‍यांना विश्वास
पालकमंत्र्यांसह सेनेेच्या चारही आमदारांचे कमबॅक होणार!

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

एकनाथराव शिंदे (Eknathrao Shinde) यांच्या बंडात (rebellion) सहभागी होणारे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil) यांच्यासह शिवसेनेचे चारही आमदार पुन्हा परततील (Shiv Sena MLAs will return) असा विश्वास जिल्हाप्रमुखांसह (district chiefs) शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी (Shiv Sena office bearers) व्यक्त केला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडात जळगाव जिल्ह्यातील पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासह आ. चिमणराव पाटील, आ. किशोर पाटील, आ. लता सोनवणे आणि सहयोगी आ. चंद्रकांत पाटील हे सहभागी झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेत फूट पडली आहे. दरम्यान आज जळगावात शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंचा फोटो छातीशी लावत पदयात्रा काढली. बंडात सहभागी झालेल्या पालक मंत्र्यांसह सेनेच्या आमदारांबाबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि पदाधिकार्‍यांनी आपल्या भावना देखिल व्यक्त केल्या आहेत.

आम्ही उध्दव साहेबांसोबतच-वाघ

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारून अत्यंत चुकीचे काम केले आहे. या बंडात जिल्ह्यातील चारही आमदार सहभागी झाल्याचे दुर्दैव आहे. मात्र कुणी कुठेही राहो आम्ही उध्दव साहेबांसोबतच असल्याचा दावा शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केला आहे. दरम्यान पालक मंत्र्यांसह सर्व आमदारांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन परत यावे अशी आमची इच्छा असल्याचेही गुलाबराव वाघ यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांसह पाचही आमदार शिवसेनेतच - डॉ. हर्षल माने एकनाथराव शिंदे यांच्यासमवेत असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासह पाचही आमदार पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंसोबत पुन्हा परततील असा विश्वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांनी दै. ‘देशदूत’शी बोलतांना केला. डॉ. हर्षल माने पुढे म्हणाले की, एकनाथराव शिंदे यांच्यासोबत जे आमदार गेले आहेत, ते आजही शिवसेनेतच आहेत. त्यांनी कुठेही पक्षांतर केले नाही. त्यामुळे त्यांना बंडखोरही आम्ही म्हणणार नाही. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासह पाचही आमदार हे परत येतील असा आम्हाला विश्वास आहे. तसेच उद्या दि. 24 रोजी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राज्यभरातील शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना मुंबई येथे बैठकीसाठी बोलावले असल्याचेह डॉ. हर्षल माने यांनी सांगितले.

जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने

आम्ही पक्षासोबतच - विष्णू भंगाळे

शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सर्व आमदारांना भावनिक साद घातली आहे. त्याला त्यांनी प्रतिसाद दिला पाहिजे. शिंदेंसह सर्व आमदारांनी पक्षप्रमुखांशी चर्चा केली पाहिजे. बंड पुकारलेले आमदार परत न आल्यास पक्ष जो निर्णय घेईल त्यासोबत आम्ही राहू अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी दिली.

राणेंसारखी अवस्था होऊ नये - गजानन मालपूरे

शिवसेनेने अनेक चढ-उतार बघितले आहेत. अनेक संकटे देखिल पेलली आहेत. हे संकट देखिल सहज पेलले जाईल. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी एकनाथराव शिंदेंसह इतर आमदारांना भावनिक साद घातली आहे. त्याला प्रतिसाद देऊन त्यांनी परत आले पाहिजे. जळगाव जिल्ह्यातील पालकमंत्री गुलाबराव पाटील व इतर चारही आमदार आमच्यासाठी आजही नेतेच आहेत. त्यांची अवस्था राणेंसारखी होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. मात्र ते सारे परत येतील आणि त्यांनी यावे अशी आमच्याकडूनही विनंती असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख गजानन मालपूरे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com