युक्रेन सीमेवर 'तिरंग्या'पुढे सारेच नमले

लोहार्‍याच्या श्रध्दा ढोणीने अनुभवला विश्वविजयी तिरंगा
युक्रेन सीमेवर 'तिरंग्या'पुढे सारेच नमले

लोहारा. Lohara ता. पाचोरा (वार्ताहर)

विजयी विश्व (World) तिरंगा (Tricolor) प्यारा झेंडा उंचा रहे हमारा, असे गीत मोठ्या अभिमानाने आपण सारे भारतीय (Indian) म्हणत असलो तरी या तिरंग्याचा खरा आदर (Respect) भारताबाहेरही आहे. याचा अनुभव पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील श्रध्दा ढोणी (Shraddha Dhoni) या विद्यार्थीनीने (student) घेतला.

श्रध्दा ही युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहे. सध्या सुरू असलेल्या युक्रेनवरील रशियन हल्यांमुळे देशाच्या नागरिकांना मानवतावादी सहाय्य प्रदान करण्यासाठी भारत सरकारचे ऑपरेशन गंगा 2022 सुरू आहे. यात परदेशात गेलेल्या नागरिकांना व विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याचे कार्य सुरू आहे. युक्रेनची हवाई वाहतूक बंद केल्याने हजारो विद्यार्थ्यांना शेजारील मित्र देशात स्थलांतर करावे लागत आहे.

युक्रेन मध्ये अडकलेली लोहारा ता.पाचोरा येथील श्रद्धा आनंद ढोणी हिला व तिच्या सोबत असलेल्या इतर विद्यार्थ्याना 13 की.मी.पायीचालत रोमानियाची सीमा गाठावी लागली. त्यात भारतीयांनाच प्रवेश मिळत असल्याने इतर देशातील विद्यार्थी ही गोंधळ करीत होते. तर काही अन्य देशातील विद्यार्थी भारतीय तिरंग्याच्या आधाराने स्वतःला सुरक्षित करीत सीमा पार करत होते.असे श्रद्धा हिने प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले.

श्रद्धा ही एम.बी.बी.एस.चे द्वितीय वर्षाचे शिक्षण घेण्यासाठी 2021 ला युक्रेन येथेल व्हिन्नीत्सिया मेमोरियल मेडिकल युनिव्हर्सिटी येथे गेली होती. बोलतांना ती पुढे म्हणाली की मला पूर्ण विश्वास होता की आपण आपल्या देशात सुखरूप पोहोचू, मला भारत सरकार बद्दल पूर्ण विश्वास होता. आतापर्यंत मी फक्त गाण्यांमध्ये ऐकले होते.

विश्वास तिरंगा है!

वरदान तिरंगा है!

मेरी जान तिरंगा है!

आणि आता हे मी प्रत्यक्षात माझ्या डोळ्यांनी कृतीतून बघितले. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुळेच हजारो विद्यार्थी मायदेशी परतत आहे, असे ती म्हणाली.!

तिकडे युद्ध सुरू होताच, युक्रेनची परिस्थिती पाहता श्रद्धा चे वडील आनंद ढोणी यांनी मुलीला परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. गावातील स्थानिक भाजप कार्यकर्ते शरद सोनार, चंद्रकांत पाटील, मुकेश पाटील यांच्याशी संपर्क केला. त्यांच्या मार्फत भाजपा तालुका अध्यक्ष अमोल शिंदे यांच्याशी फोनवर बोलणे केले. त्यांनी आमदार गिरीश महाजन यांच्याशी संपर्क करत खासदार उमेश पाटील यांच्याशीही संपर्क केला. खासदार पाटील यांनी तातडीने दिल्ली येथे कळविले दिल्लीवरून थेट रोमानिया येथे राजदूत यांच्याशी संपर्क करण्यात आला.

त्यांनी त्वरित श्रद्धाशी फोन वरून संपर्क साधला. ऑपरेशन गंगा च्या मार्फत अवघ्या सात तासात श्रद्धा हिला भारतात पोहोचविले. दि.3 मार्च रोजी सकाळी 2:00 वाजेला दिल्ली येथे महाराष्ट्र सदनला ती पोहोचली व दि.4 रोजी मुंबई येथे विमानाने रवाना झाली.

आमदार गिरीष महाजन यांचे स्वीय सहाय्यक चेतन चौधरी हे विद्यार्थिनीला मुंबई विमानतळावर स्वतः घ्यायला गेले व त्यांनी तिला महानगरी एक्सप्रेस ने पाचोरा जाण्यासाठी बसवून दिले. श्रद्धा ही दि.5 रोजी सकाळी 6:00 वाजेला पाचोरा रेल्वे स्थानकावर उतरली. यावेळी कुटुंबियासह पदाधिकारी, प्रतिनिधी, भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे लोहारा येथील चंद्रकांत पाटील, दिपक खाटीक, श्रद्धा चे वडील आनंद ढोणी, आई प्रभावती ढोणी ई. तिच्या स्वागतासाठी हजर होते. यावेळी मला घरी आणण्यासाठी प्रयत्न करणारे व भारत सरकारचे मी आभारी आहे. असे श्रद्धा म्हणाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, खासदार उन्मेष पाटील, आमदार गिरीशभाऊ महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, पाचोरा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, गटनेते शरदा सोनार,डॉ. सुभाष घोंगडे, मुकेश पाटील, चंद्रकांत पाटील, रत्नाकर पाटील. चेतन चौधरी, योगेश राजपूत, विश्वनाथ पाटील यांच्या प्रयत्नाने माझी मुलगी सुखरूप घरी पोहोचली त्यामुळे मी सर्वांचा ऋणी आहे.

आनंद ढोणी लोहारा

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com