साकळीत निवडणुकीपूर्वी 'भावी सरपंचां ' ची गावभर चर्चा !

भावी सरपंचांचे व्हाट्सअप ग्रुप , निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे !
साकळीत निवडणुकीपूर्वी 'भावी सरपंचां ' ची गावभर चर्चा !

साकळी sakli ता.यावल (वार्ताहर)

येथील हंगामी ग्रामपंचायत निवडणूक (Gram Panchayat Election) पूर्वीच गावात ' भावी ' सरपंचांची चर्चा (Discussion of 'Future' Sarpanches)चांगल्याच रंगू लागलेल्या असून इच्छुक उमेदवार (Interested candidates) म्हणजेच भावी सरपंचांनी (future sarpanches) सोशल मीडियावर (social media) आपल्या नावाने व्हाट्सअप ग्रुप (Whatsapp group) तयार करून निवडणुकीपूर्वीच (Even before the election)मोठा धुरळा उडवण्यास सुरुवात केलेली असल्याचे दिसून आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक चांगलीच रंगतदार व चुरशीची होणार असल्याचे चिन्हे दिसून येत आहे.

    साकळी ग्रामपंचायतीत सध्या अस्तित्वात असलेल्या कार्यकारणीचा मागील निवडणुकीच्या कालावधीनुसार डिसेंबर- २०२२ ला पंचवार्षिक कार्यकाळ संपत आहे. तर प्रत्यक्षात या कार्यकारिणीने  दि.५ फेब्रुवारी २०१८ पदभार घेतलेला होता. त्या अनुषंगाने नवीन निवडणूक होऊन नवीन कार्यकारणी अस्तित्वात घेणे गरजेचे आहे. त्या अंदाजे येत्या डिसेंबरच्या अखेरीस किंवा जानेवारी महिन्यात ग्रामपंचायतीचा पंचवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम लागू शकतो असा अंदाज आहे.या हंगामी निवडणुकीच्या निमित्ताने गावात राजकीय चर्चांना व घडामोडींना वेग येत आहे. कट्टया- कट्ट्यांवर ' चाय पे चर्चा ' रंगत आहे.एकूणच निवडणूक पूर्व राजकीय वातावरण चांगलेच तापत असून गावाला निवडणुकीचे वेध लागत आहे.

 या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मागील पंचवार्षिक प्रमाणे यावेळी सुद्धा लोकनियुक्त सरपंच निवडला जाणार आहे.तर संपूर्ण गावातून सहा वार्डातून एकूण १७ सदस्य निवडले जाणार आहे.

या निवडणुकीचा एक भाग म्हणून लोकनियुक्त सरपंच पदासाठी सध्या अनेक जण इच्छुक असल्याचे दिसून येत असून या इच्छुकांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी व प्रभावीपणे आपला प्रचार करण्यासाठी व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आपल्या नावे ' भावी सरपंच ' म्हणून व्हाट्सअप ग्रुप तयार केलेले आहे व या ग्रुपच्या माध्यमातून आपला जोरदार प्रचार चालविला आहे.

साकळीत निवडणुकीपूर्वी 'भावी सरपंचां ' ची गावभर चर्चा !
अतिजलद (ब्लिट्झ) बुद्धिबळ स्पर्धेत आशिया खंडात जळगावची भाग्यश्री पाटील प्रथम

गावात कितपत विकास झाला ? गावातील किती मूलभूत व नागरी समस्या सुटल्या ? कोण कोणती विकास कामे झाली ? मागील काळात ग्रामपंचायतीला आलेला विविध योजनांचा निधी किती व कसा खर्च झाला ? अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सोशल मीडियावर चर्चा रंगत आहे.गावात सध्याचे अनेक भावी सरपंचाचे ग्रुप तयार झाल्याचे पाहता हे इच्छुक उमेदवार निवडणुकीसाठी शेवटपर्यंत टिकून गेलेच तर त्यांच्या मागील सामाजिक व राजकीय गणिते पाहतात हे भावी सरपंचपदाचे इच्छुक उमेदवार गावातील मातब्बर व प्रस्थापित राजकारणी यांची फार मोठी डोकेदुखी ठरणार आहे व त्यातून  मातब्बरांना ' दे- धक्का ' देणारेही ठरू शकतात.

भावी सरपंचांच्या व्हाट्सअप ग्रुपने मतदारांचे चांगलेच मनोरंजन होत असून जसजशी निवडणूक जवळील तस तसे रोज नव-नवीन राजकीय घडामोडी पाहायला मिळणार असून त्यातून मनोरंजन होणार हे निश्चित आहे.मागील निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच पदासाठी सरळ लढत होती मात्र आता येत्या निवडणुकीसाठी सध्याचे राजकीय चित्र पाहता सरळ लढती ऐवजी तिरंगी अथवा चौरंगी लढत होण्याचीही दाट शक्यता आहे.त्यामुळे गावात सरपंच पदासाठी मोठी चुरस निर्माण होणार का ? हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com