कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिली महत्वाची सूचना

कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिली महत्वाची सूचना
USER

जळगाव - jalgaon

विभागीय कृषि सहसंचालक, नाशिक विभाग, (nashik) नाशिक मोहन वाघ, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, संभाजी ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात 16 भरारी पथकांमार्फत कृषि सेवा केंद्राच्या (Agricultural Service Centre) तपासण्या सुरू आहेत.

जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे यांनी दिनांक 31 जानेवारी, 2023 रोजी मे बालाजी सर्विसेस, टाकळी प्रचा.भडगावरोड, ता.चाळीसगाव या खत विक्री केंद्रातून मे.माई अॅग्रो जेनेटीक्स, गोपालपुर, औरंगाबाद या कंपनीचे उत्पादित केलेले पाण्यात विद्राव्य खत १३:४०:१३ बॅच क्र. ECO 40 BS/7.06.2022 व विद्राव्य 0:52:34 बॅच क्र. ECO 52 AS/7.06.2022 नमुना तपासणीसाठी घेतला होता.

हा नमुना खत तपासणी प्रयोगशाळेच्या अहवालानुसार मोठ्या फरकाने अप्रमाणित झाला आहे. त्यानुसार विक्रेत्याकडील उर्वरित साठ्यास खत नियंत्रण आदेश 1985 नुसार विक्री बंदचे आदेश देण्यात आले आहे. जिल्ह्यातील इतर खत विक्रेत्यांनी या बॅच नंबरच्या खतांची विक्री करु नये. तसे आढळल्यास खत नियंत्रण आदेश 1985 नुसार कारवाई करण्यात येईल. तसेच जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी कृषि निविष्ठांची खरेदी करतांना काळजी घ्यावी, असे आवाहनही श्री. ठाकूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com