मनसेचे झोपा काढा आंदोलन

मनपा प्रशासनाचे वेधले लक्ष
मनसेचे झोपा काढा आंदोलन

जळगाव : Jalgaon

जळगाव शहरामध्ये जवळपास दोन ते तीन वर्षापासून रस्त्यांचे तसेच भूमिगत गटारीचे काम सुरु आहे. त्यामुळे संपूर्ण शहरातील रस्त्यांची पूर्णत: वाताहात झालेली आहे. त्यातच ऐन पावसाच्या दिवसामध्ये तर जनतेला खराब रस्त्यांमुळे नरक यातना सहन कराव्या लागल्या व लागत आहेत.

याबाबत आम्ही आपणांकडे निवेदने दिले असता तसेच (Maharashtra Navnirman Sena) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वेळोवेळी आंदोलने करून सुध्दा हे प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे. त्या प्रशासनाला उठविण्यासाठी आज सकाळी मनपा इमारतीत ‘झोपा काढू’ आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन मनसे जिल्हा सचिव ॲड.जमिल देशपांडे, मनविसे जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे, जिल्हा संघटक राजेंद्र निकम यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.यावेळी जनहित शहर अध्यक्ष संदिप मांडोळे, मनविसे शहराध्यक्ष योगेश पाटील, संदीप महाले, जळगाव शहर संघटक निलेश अजमेरा, तालुका संघटक राजू बाविस्कर, महेश माळी, जळगाव तालुका संघटक गणेश नेरकर, कुणाल पाटील, कुणाल पवार, गोविंद जाधव,विशाल कुमावत, संतोष सुरवाडे, रमेश भोई, मनोज खुळे, निलेश खैरनार, अँड.दिनेश चव्हाण, मंगेश भावे, सिध्देस कवठाळकर, गोरख गायकवाड, संदिप पाटील आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.