एस.टी.कर्मचार्‍यांच्या मागण्यांसाठी राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघांचे निदर्शने

एस.टी.कर्मचार्‍यांच्या मागण्यांसाठी राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघांचे निदर्शने

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन

जळगाव - jalgaon

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (Maharashtra State Road Transport Corporation) विलिनीकरण महाराष्ट्र राज्य शासनात (Government of Maharashtra) त्वरित करा, आत्महत्या करणार्‍या परिवाराला ५० लक्ष रूपये त्वरित देऊन परिवारातील एका सदस्याला महिन्याभरात नोकरी द्या. यासह विविधि मागण्यांसाठी बुधवारी राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ संलग्न महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्य शाखेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Collector's Office) निदर्शने करण्यात आली. तसेच मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

एस.टी.कर्मचार्‍यांच्या मागण्यांसाठी राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघांचे निदर्शने
मुख्यमंत्र्यांचे एसटी कर्मचाऱ्यांना हे भावनिक आवाहन

एस.टी महामंडळातील कर्मचार्‍यांचे थकित करारासह पुढील करार त्वरित करा, अन्यायकारी शिस्त व आवेदन प्रणाली त्वरित रद्द करा. कर्जबाजारी केलेल्या एस.टी.महामंडळातील कामगार कर्मचार्‍यांचे एस.टी.को-ऑपरेटिव्ह बँकेचे कर्ज माफ करा., दोन वर्षांच्या डी.ए.ची थकबाकी त्वरित अदा करण्यात यावी. यासह विविध मागण्यांसाठी एस.टी. कामगारांचे कामबंद आंदोलन सुरु आहे.

या आंदोलनाला राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाने पाठींबा दर्शविला आहे. बुधवारी एस.टी. कामगारांच्या मागण्यांसाठी राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ संलग्न महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्य शाखेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे खान्देश प्रभारी सुमित्र अहिरे, अमजदभाई रंगरेज, किशोर नरवाडे, शैलेश नन्नवरे यांच्यासह सचिन मोरे, प्रशांत चौधरी, वसंत ठाकूर, लिलाधर चौधरी, संतोष मोरे, वंदना पाटील, निशा हिवाळे, अर्चना सोनवणे, सुजाता तायडे, डी.आर.बनसोडे, लिलाधर पाटील व इतर कर्मचार्‍यांचा सहभाग होता. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com