
जळगाव । प्रतिनिधी jalgaon
केळी, डाळिंब, स्ट्रॉबेरी बटाटा पिकांच्या टिश्यूकल्चर रोपे उत्पादनानंतर आता जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीने प्रथमतःच कॉफी आणि काळी मिरी पिकांचे टिश्यूकल्चर पद्धतीने रोपे निर्मितीचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. यामुळे कॉफी व काळी मिरी उत्पादकांना जनुकीयदृष्ट्या शुद्ध, एकसारखी व रोगमुक्त रोपांच्या उपलब्धतेमुळे उत्पन्न वाढीचा मार्ग गवसणार आहे.
जैन इरिगेशन कंपनीच्या शास्त्रज्ञांनी कॉफी व काळी मिरी या दोघंही पिकांवर अनेक वर्षे संशोधन करून प्रयोगशाळेतील विविध प्रयोगाअंती या पिकांचे टिश्यूकल्चर रोप निर्मिती तंत्रज्ञान विकसित करण्यात यश प्राप्त केले आहे. कॉफी व काळी मिरी पिकातील टिश्यूकल्चर पद्धतीने रोपे निर्मितीचे हे पहिलेच संशोधन आहे. त्यामुळे शेती, शेतकरी यांच्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या जैन इरिगेशनने जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्राचे नाव पुन्हा जागतिक नकाशावर अधोरेखित केले आहे. नावीन्यपूर्ण संशोधनासाठी कटिबद्ध असलेल्या जैन इरिगेशने आपली संशोधनाची ही परंपरा इतर पिकांवरील संशोधनात सुरू ठेवली असून लवकरच शेतकर्यांसाठी आणखी काही पिकांचे तंत्रज्ञान विकसित करून शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. जैन इरिगेशनच्या जैन हायटेक प्लांट फॅक्टरीमध्ये कॉफी पिकांची दोन प्रकारच्या प्रजाती विकसीत करण्यात आल्या आहेत. त्यात चंद्रगिरी व सी ु आर प्रजातींचा समावेश आहे. तर काळी मिरी या पिकात टिश्यूकल्चर पद्धतीने चार प्रजाती विकसीत केल्या आहेत. यामध्ये पन्नीयुर-1, पन्नीयुर-7, पन्नीयुर-8 आणि करीमुंडा यांचा समावेश आहे.