मंत्र्यांपाठोपाठ नाथाभाऊ तुम्हीही तुरुंगाच्या मार्गावर- आ. महाजन

मंत्र्यांपाठोपाठ नाथाभाऊ तुम्हीही तुरुंगाच्या 
मार्गावर- आ. महाजन

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

महागाईविरोधात (Against inflation) आम्हाला आंदोलन (Movement) करायला लावणारे नाथाभाऊ (Nathabhau) आता मंत्र्यांपाठोपाठ (ministers) तुरूंगाच्या (jail) मार्गावर असल्याची टिका भाजपाचे माजी मंत्री (Former BJP minister) गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केली. दरम्यान खासदार रक्षा खडसे (MP Raksha Khadse) आणि खासदार उन्मेश पाटील (MP Unmesh Patil) यांनीही पालकमंत्री गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil) यांच्यावर टिकेची तोफ डागली.

भाजपातर्फे भारनियमानाविरोधात (load shedding) आज जिल्हाधिकारी कार्यालयावर (Collector's Office) मोर्चा (Morcha) काढण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

आमदार गिरीश महाजन पुढे म्हणाले की, भारनियमानामुळे (load shedding) शेतकर्‍यांच्या सहनशिलतेचा अंत झाला आहे. केळी उत्पादक, टरबुज, डांगर उत्पादक शेतकर्‍याला (farmer) पाणी देता येत नसल्याने सर्वच पिक नष्ट (Crop destroyed) होण्याच्या मार्गावर आहेत. शेतकरी हवालदिल झाला आहे. महागाईविरोधात (Against inflation) आम्हाला आंदोलन करायला सांगणार्‍या एकनाथराव खडसे (Eknathrao Khadse) यांनीच आंदोलन करायला पाहीजे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तुमचे मंत्री जेलमध्ये (jail) जाताहेत तुम्ही सर्व देखील त्याच मार्गावर आहात, अश्या शब्दात गिरीश महाजन यांनी खडसेंवर हल्ला चढविला.संपुर्ण राज्य अंधारात असून, ठाकरे सरकार मात्र आपल्याच धुंदीत वावरत असल्याचाही आरोप महाजन यांनी केला.

पालकमंत्र्यांचा अभ्यास कच्चा - खासदार उन्मेष पाटील

तब्बल आठ तास वीज पुरवठा खंडीत (Power outage) होत असताना, एकीकडे जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी शिंगाडा मोर्चा (Shingada Morcha) काढणारे पालकमंत्री गुलाबराव पाटील(Guardian Minister Gulabrao Patil) आज शेतकर्‍यांसाठी एक शब्द काढायला तयार नाही. शेतकर्‍यांना खोटी माहिती देवून, केळीला फळाचा दर्जा (Banana fruit quality) भेटल्याचे सांगतात. रोजगार हमी योजनेत केळीचा समावेश झाला म्हणजे, केळीला फळाचा दर्जा मिळाला असे होत नाही. पालकमंत्र्यांचा अभ्यास कच्चा असून, त्यांची शिकवणी घेण्याची गरज असल्याचे सांगितले.

पालकमंत्र्यांना शेतकर्‍यांचा विसर - खा. खडसे

खासदार रक्षा खडसे (MP Raksha Khadse) यांनी देखील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना शेतकर्‍यांचा (farmer) विसर पडला असल्याची टीका केली. तर आमदार सुरेश भोळे यांनी नापास झालेल्या पक्षांनी एकत्रित येवून तयार केलेल्या सरकारने जनतेची वाट लावली असल्याची ठीका केली. आमदार मंगेश चव्हाण, संजय सावकारे, स्मिता वाघ यांनीही आपल्या भाषणात राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.

आपात्कालीन भारनियमन स्थगित

भाजपाच्या ठिय्या आंदोलनानंतर महावितरणचे अधीक्षक अभियंता फारूक शेख यांनी वरीष्ठांशी चर्चा करून लेखी आश्वासन दिले. यात शेतकर्‍यांना पुर्वी करण्यात येत असलेल्या विज पुरवठ्याप्रमाणेच पुरवठा करण्यात येईल. तसेच आकस्मिक विद्युतपुरवठा खंडीत करण्याच्या प्रक्रियेला स्थगिती देण्यात येत असल्याचे लेखी आश्वासन अधीक्षक अभियंता फारूक शेख यांनी आमदार गिरीश महाजन यांना दिले. तसेच लेखी आश्वासनाची प्रत जिल्हाधिकार्‍यांसह पोलीस अधीक्षकांना देण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com