शिवीगाळ करणार्‍यांना हटकल्याने विवाहितेच्या डोक्यात घातला दांडुका

शिवीगाळ करणार्‍यांना हटकल्याने विवाहितेच्या डोक्यात घातला दांडुका

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

दारुच्या (Drunk) नशेत आलेले देाघ एकमेकांना शिवीगाळ (abuse) करीत असल्याने शेजारी राहणार्‍यांना विवाहितेने अशा लोकांना याठिकाणी थांबु देत नका जाऊ असे बोलल्याचा राग (Anger for talking) आल्याने विवाहितेच्या (Married) डोक्यात लाकडी दांडुका (wooden stick in the head) टाकून तिला गंभीर जखमी (wounded) केल्याची घटना शनिवारी सकाळच्या सुमारास हरिविठ्ठल नगरात घडली.

याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील हरिविठ्ठल नगरात ममता नागेश मेेढे ही विवाहिता आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. शनिवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घरातील कामे करत असतांना त्यांच्या शेजारी राहणारे भिका कोलते यांच्याकडे काही लोक मोटारसायकलीवर आले.

शिवीगाळ करणार्‍यांना हटकल्याने विवाहितेच्या डोक्यात घातला दांडुका
VISUAL STORY : हास्य जत्रेतील प्राजक्ताचा हा लुक पाहाल तर... काळीज होईल खल्लास...

ते दारुच्या नशेत असल्याने एकमेकांना ते जोरजोराने शिवीगाळ करीत होते. दरम्यान, विवाहितेने तिच्या शेजारी राहणार्‍या मनिषा कोलते व मुलगा गौरव कोलते यांना म्हणाली की, अशा लोकांना येथे थांबु नका देत जावु नका त्याचा राग आल्याने मनिषा कोलते यांनी विवाहितेला शिवीगाळ करण्यास सुुरुवात केली.

शिवीगाळ करणार्‍यांना हटकल्याने विवाहितेच्या डोक्यात घातला दांडुका
VISUAL STORY : ५४ व्या वर्षीही या अभिनेत्रीने गुलाबी साडीत तापवलं वातावरण

याचवेळी गौरव कोलते हा हातात लाकडी दांडक्याने विवाहितेच्या डोक्यावर मारुन त्यांना जखमी करीत जीवेठार मारण्याची धमकी दिली. विवाहितेने रामानंद नगर पोलिसात तक्रार दिल्यावरुन मनिषा भिका कोलते, गौरव भिका कोलते यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com