
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
माजी पालकमंत्री आमदार गुलाबराव पाटील (Former Guardian Minister MLA Gulabrao Patil) यांच्या समर्थनार्थ (support) जिल्ह्यातील पदाधिकार्यांचे राजीनामा सत्र (Resignation Session of Officers) सुरू झाले आहे. धरणगाव पाठोपाठ रविवारी जळगाव तालुक्यातील पदाधिकार्यांनीही हाच कित्ता गिरवत गुलाबराव पाटील यांच्या पाठीशी राहण्याचा खंबीर निर्धार केला आहे. तालुक्यातील 60 पेक्षा जास्त पदाधिकार्यांनी आपापल्या पदांचे राजीनामे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे (District Chief of Shiv Sena Vishnu Bhangale) यांना सुपुर्द करून शिंदे गटात सहभागी (Participating in the Shinde group) होण्याचे जाहीर केले आहे. यात जिल्हा परिषद गट स्तरीय, पंचायत समिती गण स्तरीय तसेच विविध लोकप्रतिनिधींचा समावेश आहे.
राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांचे पडसाद आता जिल्ह्यात व तालुक्यात देखील उमटू लागले आहेत. शिवसेनेत उठाव करत, 40 आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठींबा दिल्यानंतर आता शिंदे गटात सहभागी झालेल्या आमदारांच्या समर्थनार्थ सेनेचे पदाधिकारी उतरत आहे.
जळगाव ग्रामीणमधील धरणगाव तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकार्यांनंतर आता जळगाव तालुक्यातील शिवसेनेच्या 60 हून अधिक पदाधिकार्यांनी व कार्यकर्त्यांनी शिवसेना पदाधिकारी पदाचा राजीनामा जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्याकडे देत, माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना आपला पाठींबा दिला आहे.
यामध्ये उपजिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, उपजिल्हा संघटक नरेंद्र सोनवणे, तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण यांच्यासह जि.प.चे माजी सदस्य पवन सोनवणे यांचाही समावेश आहे.
जळगाव ग्रामीणमधील प्रमुख गावांच्या सरपंच, उपसरपंचांनी देखील गुलाबराव पाटील यांना समर्थन दिले आहे. यामध्ये उपजिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, जिल्हा उपसंघटक नरेंद्र सोनवणे, तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण, जि.प.चे. माजी सदस्य पवन सोनवणे, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ.कमलाकर पाटील, जनार्दन कोळी-पाटील, तालुका उपप्रमुख धोंडू जगताप, रमेश पाटील, रवी कापडणे, पी.के.पाटील, सुनील बडगुजर, अर्जुन पाटील, संदीप सुरळकर, तरसोदचे पंकज पाटील, सुनील मराठे, अनिल कोळी, हितेश आगीवाल, विजय आमले, संदीप सोनवणे, विजय सपकाळे, गजानन जगदाडे, नितीन ठामरे, सतीश चौधरी, महेंद्र पाटील यांच्यासह अनेक पदाधिकार्यांचा यामध्ये समावेश आहे.
ज्यांनी राजीनामे दिले त्यातील एकही पदाधिकारी आक्रोश मोर्चात नव्हता. आक्रोश मोर्चात सहभागी असलेलाच खरा शिवसैनिक आहे. काहि दिवसात शिवसेनेची कार्यकारिणी बदलणार होती. त्यात त्यांना स्थान मिळणार नव्हते. म्हणूनच त्यांनी राजीनामे दिले आहेत. आम्ही पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि राहू.
विष्णू भंगाळे, जिल्हाप्रमुख शिवसेना