भाजपात 40 वर्षे हमाली केली अन् वेळेवर दुसराच डोक्यावर बसला!

खडसेंनी साधला फडणवीसांवर निशाणा
भाजपात 40 वर्षे हमाली केली अन् वेळेवर दुसराच डोक्यावर बसला!

जळगाव jalgaon ।

भाजपात (BJP) 40 वर्ष हमाली केली. घराघरापर्यंत पक्ष पोहचवला पण मुख्यमंत्रिपदाचा (Chief Minister's post) दावेदार होतो म्हणूनच मला डावलण्यात आले. मी टरबुज्या म्हणणार नाही पण मुख्यमंत्रीपदाच्यावेळी फडणवीसांना (Fadnavis) माझ्या डोक्यावर आणून ठेवले असे सांगत एकनाथराव खडसे (Eknathrao Khadse) यांनी पुन्हा आपल्या मनातील खदखद बाहेर काढत फडणवीसांवर निशाना साधला.

नशिराबाद येथे राष्ट्रवादीच्या (Nationalist) वतीने रेशन कार्ड व बारा अंकी नंबर वाटपापाचा कार्यक्रम खडसे (Eknathrao Khadse) यांच्या हस्ते पार पडला. यावेळी बोलताना ते म्हणाले की भारतीय जनता पार्टीमध्ये (BJP) चाळीस वर्ष हमाली (Hamali) केली उभ आयुष्य पक्षासाठी घातले आणि नाथाभाऊ मुख्यमंत्रिपदापर्यंत आला आणि नाथाभाऊचे वगळण्यात आले.

मी टरबुज्या म्हणणार नाही पण मी मुख्यमंत्रिपदापर्यंत येऊन पोहोचल्यानंतर माझ्या डोक्यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणून ठेवला आणि मला मुख्यमंत्री पदापासून डावलले. मुख्यमंत्रिपदाचा (Chief Minister's post) अधिकार हा खान्देशाचा होता, स्वातंत्र्याला 70 वर्ष होऊन गेले मात्र खान्देशावर अन्याय (Injustice) करण्यात आला.

70 वर्षात कोकणात नारायण राणे , मनोहर जोशी मुख्यमंत्री झालेत विदर्भातील 4 मुख्यमंत्री झाले आणि पाचवे देवेंद्र फडणवीस झाले, मराठवाड्यातील विलासराव देशमुख,अशोक चव्हाण, शिवाजीराव निलंगेकर यांच्यासह चार मुख्यमंत्री झालेत मात्र नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या उत्तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्रिपदाचा अधिकार असतानाही सत्तर वर्षात एकदाही संधी देण्यात आली नाही त्यामुळे आपण पक्षांतराचा निर्णय घेतला असेही त्यांनी सांंगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com