अखेर जळगाव ‘अस्वच्छ’तेमुळे पिछाडीवर

खान्देशात धुळे ९, भुसावळ ४६ तर जळगाव ६४ व्या क्रमांकावर !
अखेर जळगाव ‘अस्वच्छ’तेमुळे पिछाडीवर

जळगाव - Jalgaon

स्वच्छ भारत सर्वेक्षणांतर्गत शहरांच्या सर्वेक्षणानुसार देशपातळीवर जळगावांतील अस्वच्छतेवर शिक्का मोर्तब होउन जळगाव शहर पिछाडीवर गेले असून ते....

अखेर जळगाव ‘अस्वच्छ’तेमुळे पिछाडीवर
स्वच्छ शहरात इंदूर पहिले: नाशिक कितवे जाणून घ्या...

६४ व्या तर गतवेळी पिछाडीवर असलेल भुसावळने आघाडी घेत ४६ व्या स्थानावर मजल मारली आहे. तर पुरातन संस्कृतीचे अवशेष असलेले नाशिक शहराने दुसर्‍या तर नेहमीच अविकसीत अरूंद चिंचोळया गल्ल्यांचे शहर असा शिक्का असलेले धुळे महानगराने नवव्या स्थानावर स्वच्छ भारत सर्वेक्षणात आघाडी घेतली आहे.

उत्तर महाराष्ट्रात नाशिक खालोखाल सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच शेती या सर्वच क्षेत्रात अग्रेसर सुसंस्कृत तसेच शेक्षणिक हब असलेल्या जळगाव शहरात गेल्या दोन वर्षापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त, यांच्या निगराणीतून स्वच्छ भारत सर्वेक्षणात जळगाव शहराने मुसंडी मारत अव्वल स्थान मिळवले होते.

परंतु महानगरपालिकेच्या आयुक्त उपायुक्तांच्या बदल्या, स्थानिक लोकप्रतिनिधी,पदाधिकारी यांचे राजकारणाचे केंद्र असलेल्या जळगाव शहराने मात्र यंदा केंद्र सरकारतर्ङ्गे स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छ भारत सर्वेक्षण २०२०च्या निकालात पिछाडी घेतली असून तब्बल ६४ क्रमांकावर मागे गेले आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत सर्वेक्षण निकालांतर्गत देशभरातून प्रथम क्रमांकावर इंदौर , दुसर्‍या स्थानी गुजरातमधील सूरत, तिसर्‍या क्रमांकावर नवी मुंबई असून धुळे शहराने नववे स्थान पटकावले आहे. तर भुसावळ ४६ आणि जळगाव ६४ व्या स्थानावर गेले आहे.

भुसावळच्या तुलनेत जळगावची घसरण झाली असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे जळगाव शहरात विविध योजनंाची कामे प्रगतीपथावर आहेत. अमृत योजना, केबलवाहिन्यांचे खेादकाम यामुळे वर्षानुवर्षापासून रस्त्यांची दुरूस्ती हा डोकेदुखीचा विषय आहे. तर अस्ताव्यस्त असुरक्षित वाहतुक, गल्ली बोळांमधे वेळोवेळी न उचलल्या जाणार्‍या कचराकुंडया त्यातील ओसंडून जाणारा कचरा, संपूर्ण महाराष्ट्रात स्वमालकीची १७ मजले असलेली महाकाय उंच अशी एकमेव इमारत, परंतु महानगरपालिकेच्या इमारतीच्या पाठीमागे अनेक वर्षापासून विनाझाकणाचे उघडे असलेले ड्रेनेज, मोकाट जनावरांचा भटक्या कुत्र्यांचा मुक्त संचार, नारळे, फळे, फुले भाजीपाला विक्रेत्यांकडून उरलेल्या सडक्या पालेभाज्या, फुलांची घाण कचरा तेथेच कचरा कुंडयांमधे टाकला जातो परंतु वेळेवर न उचलला गेल्याने सडका वास आणि घाणीचे साम्राज्य या परीसरात नेहमीच असते.

शहराच्या निवासी व दाट वस्त्यामधे देखिल कचरा उचलणार्‍या गाडया वेळोवेळी जात नसल्याने मोठया प्रमाणावर कचर्‍याचे साम्राज्य दिसून येत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com