चाळीसगाव रेल्वेस्थानकावर ६० वर्षांनतंर हाेणार नवीन पादचारी पूल

महाबली क्रेनच्या साह्याने पुलाच्या कामाचा मोठा टप्पा पार, पादचारी पुलासाठी बसविले चार गर्डर
चाळीसगाव रेल्वेस्थानकावर ६० वर्षांनतंर हाेणार  नवीन पादचारी पूल

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

चाळीसगाव रेल्वे स्थानकावर (Chalisgaon Railway Station) ६० ते ७० वर्षांनतंर होत असलेल्या नवीन रेल्वे पुलाच्या (Railway bridge) कामाचा आज (दि,४) महत्वाचा टप्पा पार झाला. नवीन पदाचारी पुलासाठी महत्वाचे असलेले चार गर्डर(लोखंडी खांब) पुलावर महाबली क्रेनच्या सह्याने बसविण्यात आले. आता लवकरच पुलाचे उर्वरीत काम पूर्ण केले जाणार असून पुल प्रवशांच्या सोयीसाठी उपलब्ध होणार आहे.

चाळीसगाव रेल्वे स्थानक हे रेल्वेच्या भुसावळ (bhusawal) विभागातील महत्वाचे स्थानक आहे. चाळीसगाव हे चार जिल्ह्याच्या सिमेवर असल्यामुळे महाराष्ट्रसह देशभरातील प्रवशांसाठी महत्वाचे स्थानक आहे. येथून जळगाव, धुळे, नाशिक, मुंबई, औरंगाबाद (Jalgaon, Dhule, Nashik, Mumbai, Aurangabad) जाण्यासाठी नेहमीच हजारो प्रवशांची नेहमीच वर्दळ असते. तसेच देशभरात जाण्यासाठी येथून रेल्वे गाड्या आहेत.

चाळीसगाव रेल्वे स्थानकाच्या निर्मितीपासून प्रवशाना ये-जा करण्यासाठी गेल्या ७० ते ७५ वर्षांपासून एकच पादचारी पुल होता. प्रवशांची वर्दळ वाढल्यामुळे या पुलावर गर्दी होत होती. त्यामुळे चाळीसगाव स्थानकावर नवीन रेल्वे पुलाची मागणी होत असल्यामुळे, रेल्वेतर्फे नवीन पुलाच्या निर्मितीसाठी साधरणता: २०१९ मध्ये मजुंरी मिळाली होती, आणि गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून नवीन रेल्वे पुलाचे काम सुरु झाले आहे. (दि,४) पुलाचे सर्वात महत्वाच टप्पा मानला जाणारे पुलावरील चार गर्डर बसविण्यात आले आहे.

एक गर्डर साधरता;५० टन वजणाचा असून असे चार गर्डर आज बसविण्यात आले आहेत. तर उर्वरीत गर्डर देखील लवकरच बसविण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. ५० टन वजनाचे गर्डर बसविण्यासाठी मनमाड येथून १५० टन वजन क्षमतेचे साईशक्ती महाबली क्रेन मागविण्यात आले होते.

या क्रेनच्या साह्याने रेल्वेचे कर्मचारी व आधिकारी यांच्या अर्थक प्रयत्नानी हे चारही गर्डर यशस्वीपणे बसविण्यात आले आहेत. पुलाचे उर्वरीत काम देखील ठेकेदार लवकरच पुर्ण करणार असून पुल प्रवशांच्या सोयीसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती मिळाली आहे. नवीन पुलामुळेे चाळीसगाव स्थानकाच्या सुविधांमध्ये भर पडणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com