अ‍ॅड. चव्हाणांच्या पोलीस कोठडीसाठी पुनर्विलोकन अर्ज

जिल्हा सत्र न्यायालयासमोर जामीन अर्ज; आज सुनावणी
अ‍ॅड. प्रवीण चव्हाण
अ‍ॅड. प्रवीण चव्हाण

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

मविप्र संस्थेशी फसवणुकीच्या गुन्ह्यात (crime of fraud) न्यायायीन कोठडीत (judicial custody) असलेले अ‍ॅड. प्रवीण चव्हाण (Adv. Praveen Chavan) यांनी पोलीस कोठडी (Police custody) मिळावी. या करीता सरकारपक्षाकडून पुनर्विलोकन अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अ‍ॅड. चव्हाण यांनी न्यायदंडाधिकार्‍यांसमोर जामीनासाठी केलेला अर्ज मागे घेत तो अर्ज जिल्हा सत्र न्यायालयासमोर दाखल केला आहे. त्या अर्जावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

अ‍ॅड. प्रवीण चव्हाण
बारावीच्या विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या : जुनपासून पदवी अभ्यासक्रम राहणार चार वर्षाचा..
अ‍ॅड. प्रवीण चव्हाण
एक विवाह असाही...

मविप्र संस्थेच्या वादाप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात पुरवणी जबाबवरुन तत्कालीन विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांना फसवणुक केेल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवागनी केल्यानंतर अ‍ॅड. चव्हाण यांनी जामीनासाठी अर्ज केला होता.

परंतु अ‍ॅड. चव्हाण यांना तपासासाठी पोलीस कोठडी मिळावी. यासाठी सरकार पक्षाकडून सत्र न्यायालयात पुनर्विलोकन अर्ज दाखल केला होता. त्यामुळे अ‍ॅड.चव्हाण यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्‍यांसमोर केलेला जामीन अर्ज मागे घेतला आणि जामिनासाठी सत्र न्यायालयात सादर केला आहे.

अ‍ॅड. प्रवीण चव्हाण
Makeup Part 6 : न्यू जनरेशन कॉस्मेटिक्स
अ‍ॅड. प्रवीण चव्हाण
मेहरुण तलावात बुडून 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
अ‍ॅड. प्रवीण चव्हाण
तांदलवाडीत वैद्यकीय व्यावसायिकाने घेतले चार एकरांत 93 टन टरबुुजाचे उत्पादन

पुनर्विलोकनसह जामीन अर्जावर आज सुनावणी

गुरुवारी सरकारपक्षाच्यावतीने अ‍ॅड.सुनील चोरडिया यांनी युक्तिवाद केला. त्यामुळे पुनर्विलोकन अर्जावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. तर पोलिसांनी म्हणणे सादर केल्यावर जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

अ‍ॅड. प्रवीण चव्हाण
बेताच्या परिस्थितीत गुरूशिष्याच्या चढाओढीत गुंजनची चित्रकला बहरली
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com