नांद्रा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत प्रौढाचा मृत्यू

नांद्रा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत प्रौढाचा मृत्यू

नांद्रा Nandra ता.पाचोरा वार्ताहर

येथील बसस्थानक समोर उभे असलेल्या  ईश्वर भिका पाटील (वय ५५)या प्रौढास (adults) जळगाव कडून पाचोरा कडे जाणाऱ्या भरधाव वेगात असलेल्या अज्ञात चार चाकी (four wheeler) वाहनाने रात्री ८:३०च्या सुमारास धडक (strike) दिल्याने ईश्वर पाटील हे गंभीर जखमी झाले होते या प्रसंगी ट्रक टर्मिनल वर अत्यावश्यक सेवा मध्ये असलेली  अशोका कंपनीच्या ऍम्बुलंन्सने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.दि.२८ रोजी रात्री १२च्या सुमारास त्यांचा मृत्यू (death) झाला.

नांद्रा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत प्रौढाचा मृत्यू
धुळे-दादर त्रि-साप्ताहिक विशेष रेल्वेला सुरवात

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शेती व हातमजुरी मजूरी करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असलेल्या गरीब कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने गावात व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याप्रसंगी पुन्हा एकदा गतीरोधकची मागणी  जोर धरत आहे

येथील महामार्ग क्रमांक ७५३जे चे काम झाल्यापासून रस्त्यावर भरधाव वेगाने वाहतूक सुरू असल्याने नेहमीच लहान मोठे अपघात होत असतात. या ठिकाणी माहेजी कडे एरंडोल कडे जाणारा रस्ता व जळगाव पाचोरा  जाणारा  असा तिहेरी मार्ग बस स्थानकावर जवळ जातं असल्याने या ठिकाणी प्रचंड वाहतुकांसह शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची व प्रवाशांची ही मोठी वर्दळ असते अनेक वेळा गतीरोधक ची मागणी संबंधित विभागाकडे करण्यात आली आहे

.तरी या गतीरोधकाच्या मागणी कडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे.या अपघातानंतर तरी नांद्रा गावातील  रस्त्यावरच्या सर्व स्कूलच्या ठिकाणी व त्रिफुली ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग धुळे1 यांनी त्वरित  गतिरोधक मंजूर करून कार्यवाही करावी अशी मागणी परिसरातील जागृत नागरिकांकडून करण्यात येत आहे 

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com