सद्य:स्थितीत नवीन शैक्षणिक धोरणाचा स्वीकार करा!

इकरा आयोजित चर्चासत्रात प्रा. अन्सारी यांचे प्रतिपादन
सद्य:स्थितीत नवीन शैक्षणिक धोरणाचा स्वीकार करा!

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

सद्यस्थितीत विद्यार्थ्यांना (students) गुणवत्तापूर्ण शिक्षण (quality education) देण्याची आवश्यकता आहे. शिक्षण उद्देश पूर्ण असावे तसेच उद्देश पूर्ण झाले की नाही त्यासंदर्भात विद्यार्थ्यांचा, पालकांचा, समाजाचा फीडबॅक घेण्यात यावा. नवीन शैक्षणिक धोरणाच्या (new educational policy) चांगल्या गोष्टींचा स्वीकार करावा तसेच शिक्षण रोजगारक्षम असावेफ यावर त्यांचा भर द्याव असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. अब्दुल कय्युम अन्सारी ( Pros .Abdul Qayyum Ansari) यांनी केले.

इकरा शिक्षण संस्था जळगाव व ऑल इंडिया एज्युकेशनल मूव्हमेंट, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने 14 वा तालिमी कारवा तर्फे शैक्षणिक सुधारणा या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चा आयोजीत करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. पहिल्या सत्रात इकरा युनानी मेडीकॅल कालेज व इकरा कोविड सेंटर, इकरा बी. एड. कालेज, इकरा डी. एड. कालेज व इकरा पब्लिक स्कूल यांची दिल्ली येथील तालिमी कारवाच्या सर्व सदस्यांनी पाहणी केली.दुसर्‍या सत्रात शैक्षणिक सुधारणा या विषयावर इकरा एच. जे. थीम महाविद्यालयात संपन्न झाले. यावेळी सय्यद मंसूर आगा, प्रा. अब्दुल कय्युम अन्सारी, अ‍ॅड.एम. असलम अहेमद, प्रा. अख्तर अन्सारी, मोहम्मद इलियास, अलहाज अहेमद घौरी, महेर आगा, जकीया परवीन तसेच बीड चे मो. सफी अनवारी उपस्थित होते. तिसर्‍या सत्रात सय्यद मन्सूर आगा म्हणाले की, आज समाजात, परिवारात संवाद बंद असल्याने नैतिकता ढासळत आहे. आपण धर्माने सांगितलेल्या जीवन मूल्यांचे आचरण करीत नाही व धर्मातील केलेल्या बाह्य आडंबरास खरा धर्म मानत आहोत. प्रत्येक समाजाच्या अनुयांनी चारित्र्य जोपाल्यास एकमेंका विषयी असलेली घृणा कमी होण्यास मदत होणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

इंडिया इन टालेरन्स पुस्तकाचे प्रकाशन

चौथे सत्र महिलांसाठी समाजाच्या शैक्षणिक विकासात महिलांचे योगदान विषयावर घेण्यात आले. या सत्रात मेहर आगा, जकीया परवीन, यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अंजुमने तालीमुल मुस्लेमिन संस्थेचे अध्यक्ष एजाज अब्दुल गफ्फार मलिक यांच्या शैक्षणिक पत्रिकेचे व तारीख अन्वर लिखित इंडिया इन टालेरन्स पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. तर पाचव्या सत्रात तालिमी कारवा सोबत चर्चा करण्यात आली.शैक्षणिक संस्थेत विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक मिळून ते समाजात उत्कृष्ट कार्य करीत आहे. इकरा शिक्षण संस्थेत काम करणारे प्राध्यापक, डॉक्टर, शिक्षक यांनी नाविन्य पूर्ण केलेल्या कामा बाबत चर्चा करून व त्यांचा गौरव करण्यात आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com