एमएएमसीजेसाठी 15 सप्टेंबरपर्यंत प्रवेशाची अंतिम मुदत

एमएएमसीजेसाठी 15 सप्टेंबरपर्यंत प्रवेशाची अंतिम मुदत

जळगाव । Jalgaon । प्रतिनिधी

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जनसंवाद आणि पत्रकारिता विभागात डिप्लोमा इन जर्नालिझम (Diploma in Journalism) आणि एम.ए.एम.सी.जे. (M.A.M.C.J.)(जनसंवाद आणि पत्रकारिता) या कौशल्य आधारित व रोजगारभिमुख पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ऑनलाईन प्रवेशाची (Online access) अंतिम मुदत दि. 5 सप्टेंबरपर्यंत आहे.

डिप्लोमा इन जर्नालिझम (Diploma in Journalism) हा बारावी नंतरचा एक वर्षीय अभ्यासक्रम विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागात यावर्षीपासून प्रथमच सुरु करण्यात आला आहे. डिप्लोमा इन जर्नालिझमला (Diploma in Journalism) प्रवेश घेण्यासाठी इयत्ता बारावीत किमान 40 टक्क्यांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच एम.ए. एम.सी.जे. (जनसंवाद आणि पत्रकारिता) हा दोन वर्षीय पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमात ऑडिटकोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इतरही अधिकचे कौशल्य शिकता येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराचे नवे दालन उपलब्ध होणार आहे. दोन्ही अभ्यासक्रम पूर्णत: रोजगारभिमुख असून यशस्वी विद्यार्थ्यांना वृत्तपत्रे, रेडिओ, टेलिव्हिजन, ऑनलाईन पत्रकारिता, सोशल मिडिया, जाहिरात संस्था आदी ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध आहे.

प्रवेशाकरीता विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या.nmu.ac.in या संकेतस्थळावर भेट देवून ऑनलाईन अ‍ॅडमिशन लिंकला क्लिक करून प्रवेशासंबंधी अर्ज करणे आवश्यक आहे. ऑनलाईन पध्दतीने प्रवेश अर्ज भरतांना आवश्यक त्या कागदपत्रांची स्कॅन कॉपी सोबत जोडणे गरजेचे आहे. तरी इच्छूक विद्यार्थ्यांनी डिप्लोमा इन जर्नालिझम (Diploma in Journalism) आणि एम.ए.एम.सी.जे.(M.A.M.C.J.) प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी विभागप्रमुख प्रा.डॉ.सुधीर भटकर मो.8407922404, डॉ.विनोद निताळे मो.9860046706, डॉ.गोपी सोरडे मो.9834166072 अथवा विभागात कार्यालयीन वेळेत 0257-2257436, 2257438 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील माहितीपत्रक वाचावे, असे आवाहन कला व मानव्यविद्या प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ.अनिल चिकाटे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com