बंडखोरांना प्रत्युत्तर देण्यासाठीच आदित्य ठाकरेंचा दौरा यशस्वी करणार

युवासेनेतर्फे आयोजित बैठकीत पदाधिकार्‍यांचा निर्धार
बंडखोरांना प्रत्युत्तर देण्यासाठीच आदित्य ठाकरेंचा दौरा यशस्वी करणार

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शिवसेनेशी (Shiv Sena) ज्या आमदारांनी गद्दारी (Betrayal by MLAs) केली आहे, त्या आमदारांच्या गद्दारीचा समाचार (News of betrayal) घेण्यासाठी आणि बंडखोरांना प्रत्युत्तर (Reply to Rebels) देण्यासाठीच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Yuva Sena chief Aditya Thackeray) यांचा जिल्हा दौरा (District Tour) यशस्वी करण्याचा निर्धार आज झालेल्या बैठकीत पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला.

युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे दि. 9 रोजी जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना आणि युवासेनेच्या पदाधिकार्‍यांची नियोजनाची बैठक पार पडली.

या बैठकीला शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, महापौर जयश्री महाजन, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, डॉ. हर्षल माने, समाधान महाजन, महानगरप्रमुख शरद तायडे, युवासेनेचे विराज कावडीया, जि.प. सदस्य नानाभाऊ महाजन, धरणगावचे नगराध्यक्ष नीलेश चौधरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत युवासेना प्रमुख आदीत्य ठाकरे यांच्या दौर्‍यानिमित्त जोरदार शक्तीप्रदर्शनाचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच ज्या भागांमध्ये आदीत्य ठाकरे हे दौरा करणार आहेत, त्याठिकाणी भगवेमय वातावरण करून बंडखोरांना जोरदार प्रत्युत्तर द्यावे असे आवाहन करण्यात आले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com