डॅमेज-कंट्रोलसाठी आदित्य ठाकरे मंगळवारी जिल्ह्यात

शिवसेना नेते, युवासेना प्रमुखांकडून तयारीसाठी रविवारी जिल्हा बैठक
आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेचे (Shiv Sena) 40 आणि 10 अपक्ष आमदारांसह (MLAs) एकूण 50 आमदार फुटीनंतर जळगाव जिल्ह्यात देखील त्याचे पडसाद उमटले आहेत. आता शिवसेना डॅमेजकंट्रोलसाठी (Damage control) शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे स्वत: मैदानात उतरले असून दि. 9 ऑगस्ट रोजी ते खान्देशसह जळगाव जिल्ह्यात (Will come to Jalgaon district) येणार आहे. त्यादृष्टीने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख यांच्यासह शिवसेना पदाधिकार्‍यांकडून रविवारी जिल्हास्तर बैठकीची तयारी सुरु आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेला खिंडार पडली असून जिल्ह्यातील माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आ.चिमणराव पाटील, आ.किशोर पाटील, आ. लताताई सोनवणे, अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे जिल्ह्यातील पाच आमदार शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर त्याचे दूरगामी परिणाम होऊन नये,म्हणून शिवसेना नेत्यांकडून मतदार संघनिहाय बैठका घेतल्या जात आहे. तसेच शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आ.आदित्य ठाकरे हे दि.9 ऑगस्ट रोजी जळगाव जिल्ह्यात येणार असून त्यांचा तालुकानिहाय दौरा देखील पात्र झाला आहे.

असा राहील मिनीट टू मिनीट दौरा

शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आ.आदित्य ठाकरे हे दि.9 ऑगस्ट रोजी सकाळी 10.15 वाजता जळगाव विमानतळ. त्यानंतर पाचोरा येथे सकाळी 11.30 वाजता संवाद दौरा करणार आहे. पाचोर्‍याहून ते धरणगाव येथे दुपारी 1.45 वाजता जळगाव ग्रामीण दौरा, तर दुपारी 2.15 वा. धरणगाव ते पारोळा येथे दौरा करणार असून दुपारी 3 वाजता एरंडोल येथे पदाधिकार्‍यांसह शिवसैनिकांशी संवाद करतील. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता पारोळ्याहून धुळ्याकडे रवाना होणार आहे.

रविवारी पदाधिकार्‍यांची बैठक

जिल्ह्यात होऊ घातलेल्या शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आ.आदित्य ठाकरे यांच्या दौर्‍याच्या नियोजनासाठी शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्या आदेशाने दि. 7 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वा. सरदार वल्लभभाई पटेल हॉल (लेवा भवन) जळगाव येथे युवासेनेची महत्वाची जळगाव जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीला शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, महापौर जयश्री महाजन, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, उपमहापौर कुलभूषण पाटील, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदा पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच युवासेनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव विराज कावडिया व युवासेना विस्तारक किशोर भोसले, चैजन्य बनसोडे सुद्धा उपस्थित राहणार आहेत.जळगाव व रावेर लोकसभेतील प्रत्येक तालुका, विधानसभा येथील सर्व युवासेना पदाधिकारी, युवासैनिक यांनी बैठकीसाठी उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.

तिघ बंडखोरांच्या मतदार संघात शक्तीप्रदर्शन

अनेक वर्षांपासून शिवसेनेचे एकनिष्ठतेने काम करणारे आमदार फुटल्याने त्यात फक्त पाचोरा, जळगाव ग्रामीण आणि एरंडोल-पारोळा मतदार संघात युवासेना प्रमुख आ.आदित्य ठाकरे यांनी दौरा आखला आहे. या मतदार संघात शिवसेनेला भविष्यात मोठे खिंडार पडण्याची शक्यता गृहीत धरुन डॅमेज कंट्रोलसाठी आ.गुलाबराव पाटील, आ.चिमणराव पाटील, आ.किशोर पाटील या तीन आमदारांच्या मतदार संघात दौरा होणार असल्याची चर्चा सुरु आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com