
जळगाव - jalgaon
चिंचोली व कुसंबे येथे अतिरिक्त औद्योगिक क्षेत्र उभारण्यास मान्यता मिळावी यासाठी आज पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सोबत मंत्रालयात बैठक घेण्यात आली. त्यात जळगाव येथे जळगाव एम. आय. डी. सी. चा वाढता विस्तार पाहता जळगाव तालुक्यात चिंचोली - पिंपळे व कुसंबे येथे अतिरिक्त औद्योगिक वसाहत उभारण्याची गरज असल्याचे निदर्शनास आणून याबाबत मंत्रालय स्तरावर प्रस्ताव प्रलंबित असल्याचे सांगितले. त्यानुसार उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी चिंचोली व कुसंबे येथे अतिरिक्त औद्योगिक क्षेत्र उभारण्यास मान्यता दिल्याने रोजगार निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच याबाबत शासन निर्णय निघणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
रोजगार निर्मितीला चालना : या संदर्भात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, जिल्ह्यात रोजगार निर्मीतीसाठी औद्योगीक विकास होणे आवश्यक आहे. या अनुषंगाने उद्योजकांच्या सर्व समस्या जाणून घेत त्यांचे निराकरण करण्याला आपले प्राधान्य राहणार असून रोजगार निर्मितीसाठी आपण सातत्याने उद्योजकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याची ग्वाही देखील ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.
- पालकमंत्री
या संदर्भात माहितीशी की, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक व जळगाव उद्योग क्षेत्रातील विविध संघटना यांनी जळगाव औद्योगिक क्षेत्रा लागत नवीन जागा भूसंपादनाची मागणी करून तालुक्यात चिंचोली व कुसंबे येथे अतिरिक्त औद्योगिक वसाहत स्थापन करण्यास मान्यता मिळावी अशी मागणी केली होती. जळगाव औद्योगिक क्षेत्रात लगत प्रस्तावित अतिरिक्त जळगाव औद्योगिक क्षेत्र टप्पा क्र. 1 स्थापन करणे बाबत जिल्हाधिकारी यांच्याकडील आढावा बैठकीत नुसार कुसुंबे खुर्द व चिंचोली येथील प्रस्तावित क्षेत्राची प्रादेशिक अधिकारी, उप रचनाकार, उप अभियंता जळगाव व भूमापक यांचे मार्फत प्राथमिक स्थळ पाहणी करून व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मागणीनुसार व उद्योगमंत्री यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ चे प्रादेशिक अधिकारी धुळे यांनी महाव्यवस्थापक महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ मुख्यालय मुंबई यांना मौजे कुसुंबे खुर्द चिंचोली येथे औद्योगिक वसाहत स्थापन करणे बाबत प्रस्ताव सादर केलेला होता. त्यानुसार चिंचोली-पिंपळे व कुसंबे येथे अतिरिक्त औद्योगिक क्षेत्र (चखऊउ) उभारण्यास उद्योग मंत्री सामंतांची मान्यता मिळाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आभार मानले आहे.