शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ४०० रुपयांचा अतिरिक्त फायदा-खा.रक्षा खडसे

रावेरवरून १० वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर कानपुर साठी वॅगन रवाना
हिरवी झेंडी दाखवताना खा.रक्षा खडसे
हिरवी झेंडी दाखवताना खा.रक्षा खडसे

रावेर Raver|प्रतिनिधी-

कानपुरसाठी (Kanpur) सुरू झालेली रेल्वे वाहतूक (Rail transport) शेतकऱ्यांसाठी (farmers) फायदेशीर (Beneficial) असून,ट्रक आणी रेल्वे भाड्यात बरीच तफावत असल्याने प्रति क्विंटल ४०० रुपये भावाव्यतिरिक्त फायदा केळी उत्पादकांच्या (Banana growers) खिशात पडणार असल्याचे प्रतिपादन खा.रक्षा खडसे (Kha. Raksha Khadse) यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांना अडचणीत प्रत्येक वेळी मदत करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी भाव प्रकट केले.

सुमारे १० वर्षांपासून रावेर माल धक्क्यावरून बंद पडलेली कानपुर केळी निर्यात (Kanpur banana export) दि.२६ पासून शनिवार पासून पूर्ववत झाली. यावेळी खा.रक्षा खडसे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून वॅगन रवाना करण्यात आली. यानिमित्ताने रावेर फळबागायतदार मंडळाच्या (Orchard Board) खा.रक्षा खडसे प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

याप्रसंगी भाजप किसान मोर्च्यांचे संपर्क प्रमुख सुरेश धनके,भाजप जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन,प्रल्हाद पाटील,पद्माकर महाजन,भाजप युवा मोर्च्या जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन,तालुकाध्यक्ष राजन लासुरकर,भागवत पाटील,माजी नगराध्यक्ष हरीश गणवानी,माजी सभापती जितू पाटील,भाजप शहराध्यक्ष दिलीप पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.

आज रावेरहुन रवाना झालेल्या कानपूर रॅकद्वारे ४ हजार ५०० क्विंटल केळी रवाना (Bananas departed) झाली आहे.येत्या मंगळवारी दुसरा रॅक रवाना होणार आहे.यासाठी रावेर फळबागायतदार युनियनचे अध्यक्ष रामदास पाटील,उपाध्यक्ष किशोर गणवाणी,सचिव रवींद्र पाटील व संचालक मेहनत घेत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com